Tiger Shroff went with his girlfriends direction Patani for the new year's reception abroad | टायगर श्रॉफ आपली गर्लफ्रेंड दिशा पटानीसोबत गेला परदेशात नव्या वर्षाच्या स्वागतासाठी
टायगर श्रॉफ आपली गर्लफ्रेंड दिशा पटानीसोबत गेला परदेशात नव्या वर्षाच्या स्वागतासाठी
नव्या वर्षाच्या स्वागतासाठी फक्त सर्वसामान्य नाही तर सेलिब्रेटी ही मुंबईतून आपल्या डेस्टिनेशनच्या ठिकाणी निघून गेले आहेत. टायगर श्रॉफ आणि त्याची गर्लफ्रेंड दिशा पटानी मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाले. त्यांच्यासोबत रणवीर सिंग ही दिसला. मीडियाच्या रिपोर्टनुसार रणवीर, दीशा आणि टायगर न्यू-ईअरच्या स्वागतासाठी श्रीलंकेला रवाना झाले आहेत. फोटोंमध्ये टायगर गर्लफ्रेंड दिशा पटानी त्याच्या मांडीवर बसलेला दिसत आहे.या फोटोला टायगर श्रॉफच्या फॅनक्लने सोशल मीडियावर शेअर केले आहे. टायगर आणि दिशा न्यू- ईअरची पार्टी करण्यासाठी श्रीलंकेला रवाना झाले आहेत.  टायगर आणि दिशा नेहमीच सार्वजनिक ठिकाणी किंवा पार्ट्ंयामध्ये एकत्र फिरताना दिसतात. लाँग ड्राईव्हवर जाताना सुद्धा दोघे स्पॉट झाले आहेत. मात्र दोघांनी ही अजूनपर्यंत आपले नातं कधी स्वीकारले नाही. मात्र मीडियाचे कॅमरे ते नेहमीच बिनधास्तपणे फेस करतात.
 


लवकरच टायगर आणि दिशा 2 मध्ये एकत्र दिसणार आहेत. पहिल्यांदा दोघांची ऑफस्क्रिन केमिस्ट्री ऑनस्क्रिन दिसणार आहे. या चित्रपटाचा बजेट जवळपास 50 कोटींचा असल्याचे बोलले जाते आहे. या चित्रपटाची शूटिंग जवळपास संपली आहे. साजिद नाडीयादवाला या चित्रपटाची निर्मिती करत असून दिग्दर्शनाची धुरा अहमद खान सांभाळतो आहे.साजिद आणि टायगरचा हा ३रा चित्रपट आहे. या आधी टायगरने साजिद बरोबर हिरोपंती आणि बागी हे चित्रपट केले आणि ते यशस्वी ठरले आहेत. बागी चित्रपटाच्याच्या पहिल्या पार्टमध्ये आशिकी फेम श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत दिसली होती पण 'बागी२' मध्ये दिशा पटानी  मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

ALSO READ :  श्रॉफची गर्लफ्रेंड दिशा पटानीचा हा व्हिडीओ होतोय व्हायरल!!

या चित्रपटातील अ‍ॅक्शन सिन्ससाठी त्याला विशेष प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.हे प्रशिक्षण त्याला टॉनी देणार आहे. टॉनीने शाओलिन सॉकर या चित्रपटासाठी कोरिओग्रॉफी केली आहे. 'बागी२' कितपत यशस्वी ठरतो आणि टायगर ला दिशा किती लकी ठरते. दिशाला आतापर्यंत बॉलिवूडमध्ये फारसे चित्रपट मिळाले नाहीत. सुशांत सिंग राजपूतच्या एम.एस धोनी अनटोल्ड स्टोरी चित्रपटात ती दिसली होती. 

Web Title: Tiger Shroff went with his girlfriends direction Patani for the new year's reception abroad
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.