गर्लफ्रेंड दिशा पटानी आणि फॅमिलीसोबत डिनरला गेला टायगर श्रॉफ, फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 03:33 PM2021-01-13T15:33:34+5:302021-01-13T15:34:14+5:30

अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी बऱ्याचदा एकत्र दिसतात.

Tiger Shroff went to dinner with his girlfriend Disha Patani and family, the photo came in front | गर्लफ्रेंड दिशा पटानी आणि फॅमिलीसोबत डिनरला गेला टायगर श्रॉफ, फोटो आले समोर

गर्लफ्रेंड दिशा पटानी आणि फॅमिलीसोबत डिनरला गेला टायगर श्रॉफ, फोटो आले समोर

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी एकत्र पाहून त्यांचे चाहते खूष होतात. असे तर दोघे एकमेकांचे फ्रेंड्स असल्याचे सांगतात मात्र त्यांच्या डेटिंगची चर्चा बऱ्याच कालावधीपासून सुरू आहे. मंगळवारी दिशा आणि टायगर दोघेही फॅमिली डिनरसाठी गेले होते. त्यावेळचे त्यांचे फोटो समोर आले आहेत.


अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी बऱ्याचदा एकत्र दिसतात मात्र काल असे झाले नाही. यावेळी त्यांच्या दोघांसोबत टायगर श्रॉफची फॅमिलीदेखील पहायला मिळाली. त्या दोघांसोबत टायगर श्रॉफची आई आणि त्याची बहिण कृष्णा श्रॉफदेखील उपस्थित होती. ते सर्व डिनर करून रेस्टॉरंटमधून बाहेर पडले तेव्हा त्यांना कॅमेऱ्यात कैद करण्यात आले.

यावेळी टायगर श्रॉफने स्पोर्टी टीशर्ट आणि ब्लॅक ट्राउजर घातली होती तर दिशा पटानीने नेहमी प्रमाणे आपल्या लूकने इंप्रेस केले. यावेळी तिने मरून रंगाचे आउटफिट घातले होते. त्यासोबत ब्लॅक स्लिंग बॅग आणि व्हाइट स्लिपर्ससोबत आपला लूक कंप्लीट केला. संपूर्ण फॅमिली एकाच कारमधून जाताना दिसली. टायगर श्रॉफच्या कुटुंबासोबत दिशाचा फोटो चाहत्यांना खूप भावतो आहे.


टायगर श्रॉफच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तो गणपत ः पार्ट १मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला या वर्षी म्हणजेच २०२१ला सुरूवात होणार आहे आणि हा चित्रपट २०२२ला रिलीज होईल. या चित्रपटाचा आणखीन एक भाग येणार आहे. टायगरने सोशल मीडियावर या चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केला होता.


तर दिशा पटानीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर लवकरच ती सलमान खानसोबत राधेः योर मोस्ट वाँटेड भाईमध्ये दिसणार आहे. याशिवाय दो व्हिलन, केटिना या चित्रपटातही काम करताना दिसणार आहे.

Web Title: Tiger Shroff went to dinner with his girlfriend Disha Patani and family, the photo came in front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.