आता आम्ही एकत्र नाही...! टायगर श्रॉफच्या बहिणीची पोस्ट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2020 10:21 AM2020-11-15T10:21:30+5:302020-11-15T10:26:11+5:30

कृष्णाने शेअर केलेली पोस्ट चर्चेत

tiger shroff sister krishna shroff breaks up with boyfriend | आता आम्ही एकत्र नाही...! टायगर श्रॉफच्या बहिणीची पोस्ट व्हायरल

आता आम्ही एकत्र नाही...! टायगर श्रॉफच्या बहिणीची पोस्ट व्हायरल

googlenewsNext
ठळक मुद्दे25 वर्षांची कृष्णा सोशल मीडियावर अक्टिव्ह आहे. ती नेहमीच आपल्या मित्रांसोबत पार्टी करताना दिसते.

अभिनेते जॅकी श्रॉफ यांची मुलगी आणि टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफ तिच्या रिलेशनशिप स्टेटसमुळे चर्चेत असते. पण आता कृष्णाचे ब्रेकअप झालेय. होय, कृष्णा व तिचा बॉयफ्रेन्ड एबन हेम्स यांचे नाते संपुष्टात आले आहे. खुद्द कृष्णाने सोशल मीडियावर यासंदर्भात माहिती दिली. तिची पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरते आहे.

कृष्णा व एबन दोघेही सुमारे दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. या काळात दोघांचेही रोमॅन्टिक फोटो खूप व्हायरल झालेत. लॉकडाऊनदरम्यानही दोघे एकत्र राहिले होते. आता मात्र दोघांचे मार्ग वेगळे झाले आहेत. का, हे माहित नाही. मात्र कृष्णाने स्वत: याबद्दल एक इन्स्टा स्टोरी शेअर केली. सोबत स्वत:च्या इन्स्टाग्रामवरचे एबनसोबतचे सर्व फोटोही डिलीट केलेत.

‘माझे फॅन क्लब खूप क्यूट आहेत पण माझी एक विनंती आहे. कृपया एबनसोबत असलेल्या फोटोंमध्ये मला टॅग करु नका. कारण आता आम्ही एकत्र नाही’, असे तिने स्टोरीमध्ये म्हटले आहे.
कृष्णाची फॉलोर्इंग लिस्ट चेक केली असता, आता तिने एबनला फॉलो करणेही बंद केल्याचे दिसते.
काही दिवसांपूर्वीच कृष्णा व तिच्या बॉयफ्रेन्डचे ब्रेकअप झाल्याची चर्चा होती. मात्र याचदरम्यान कृष्णाने त्याच्यासोबतचा एक रोमॅन्टिक फोटो शेअर केला होता. या फोटोनंतर दोघांच्या ब्रेकअपच्या बातम्या अफवा असल्याचे सिद्ध झाले होते. मात्र आता ही अफवा नसून खुद्द कृष्णाने ब्रेकअप झाल्याचे जाहिर केले होते.


 

एबन हा एक आॅस्ट्रेलियन बॉस्केटबॉल प्लेयर आहे.  एका  मुलाखतीत कृष्णाने तिच्या आयुष्यात एक व्यक्ती असल्याची कबुली दिली होती. मी ज्याच्यासोबत आहे, आनंदी आहे. मला काहीही लपवण्याची गरज नाही, असे ती म्हणाली होती. यानंतर सोशल मीडियावर एबनसोबतचे अनेक फोटो तिने शेअर केले होते.

25 वर्षांची कृष्णा सोशल मीडियावर अक्टिव्ह आहे. ती नेहमीच आपल्या मित्रांसोबत पार्टी करताना दिसते. नेहमी स्टनिंग लूकमध्ये दिसणारी कृष्णा आपल्या भावाप्रमाणे दबंग आहे. टायगर वडिलांच्या पाउलावर पाऊल ठेवत फिल्म इंडस्ट्रीमध्ये आला. त्याने अ‍ॅॅक्शन स्टार म्हणून स्वत:ची वेगळी ओळख बनवली. पण जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा मात्र कायम पडद्यामागे राहणे पसंत करते.

टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफचा बॉयफ्रेन्डसोबत ‘बोल्ड’ रोमान्स, शेअर केला हा फोटो

SEE PICS : टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफचे हॉट फोटोशूट, बोल्ड अदा पाहून सगळेच थक्क

Web Title: tiger shroff sister krishna shroff breaks up with boyfriend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.