Tiger Shroff lifted 200 kg by surprise; Video viral! | २०० किलो वजन उचलून टायगर श्रॉफने केले आश्चर्यचकित; व्हिडीओ व्हायरल!

२०० किलो वजन उचलून टायगर श्रॉफने केले आश्चर्यचकित; व्हिडीओ व्हायरल!

बॉलिवूडचा अ‍ॅक्शन हिरो म्हटलं की, दोन नावे समोर येतात. ते म्हणजे हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ.टायगर श्रॉफ हा हृतिक रोशनला गुरू मानतो. हृतिकप्रमाणेच टायगरचेही फॅन फॉलोअर्स प्रचंड आहेत. अशातच टायगरने  आपल्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. आता तुम्ही म्हणाल कसे? तर टायगर श्रॉफने एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात तो जीममध्ये वर्कआऊट करताना दिसत आहे. पण, त्यासोबतच तो चक्क २०० किलो वजन उचलतो आणि त्याच्या फॅन्सना आश्चर्यचकित करतो. या व्हिडीओला खूप लाईक्स आणि कमेंटस मिळत आहेत. 

तुम्हाला तर ठाऊक आहेच की, टायगर श्रॉफ प्रचंड फिटनेस फ्रिक आहे. तो आपल्या फिटनेसची खूप काळजी घेतो. तो जिममध्ये योग्य ते वर्कआऊट करतो. त्याच्या बॉडीचे कोटींच्या घरात दिवाने आहेत. आता मात्र त्याने असे काही केले आहे की, त्याच्या फॅन्सना प्रचंड अभिमान वाटेल असे काम केले आहे. त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तो २०० किलो वजनाचे वेट लिफ्टिंग करतांना दिसतो आहे. त्याच्यासोबत त्याचा एक इन्स्ट्रक्टर देखील आहे. तो त्याला मार्गदर्शन करत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना टायगरने कॅप्शन दिले आहे, ‘मी स्वत:ला २०० किलोग्रॅमपर्यंत वजन उचलू शकेल एवढी मेहनत मी आत्ताच करत आहे. कॉलेजच्या दिवसांत एकदा तसा प्रयत्न करून पाहिला होता.’ या पोस्टला ९ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. या त्याच्या व्हिडीओचे अभिनेता इशान खट्टरने देखील कौतुक केले आहे. 

टायगर श्रॉफच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास, टायगर श्रॉफ हा अलीकडेच ‘स्टुडंट ऑफ  द ईयर २’ या चित्रपटात दिसला होता. त्याच्यासोबत अनन्या पांडे, तारा सुतारिया हे देखील दिसले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार काही कमाल दाखवू शकला नाही. मात्र, आता तो गुरू मानत असलेल्या अभिनेता हृतिक रोशनसोबत ‘वॉर’ या चित्रपटात दिसणार आहे.

Web Title: Tiger Shroff lifted 200 kg by surprise; Video viral!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.