Throwback : ‘तेरे नाम’मध्ये बनली होती भिकारी, खऱ्या आयुष्यात दिसते लय भारी; पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 08:00 AM2021-08-11T08:00:00+5:302021-08-11T08:00:07+5:30

‘तेरे नाम’मध्ये तिच्या वाट्याल एकही संवाद आला नाही. पण तिच्या चेहऱ्यावरचे जिवंत भाव बघून प्रेक्षक तिच्या प्रेमात पडलेत...

throwback do you remember the beggar girl radhika from salman khan film tere naam | Throwback : ‘तेरे नाम’मध्ये बनली होती भिकारी, खऱ्या आयुष्यात दिसते लय भारी; पाहा फोटो

Throwback : ‘तेरे नाम’मध्ये बनली होती भिकारी, खऱ्या आयुष्यात दिसते लय भारी; पाहा फोटो

googlenewsNext
ठळक मुद्दे ‘तेरे नाम’नंतर राधिकाने अन्य एक दोन सिनेमे केलेत आणि अचानक अभिनयाला रामराम ठोकला.

2003 मध्ये आलेला ‘तेरे नाम’ (Tere Naam) या सिनेमाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले होते. राधे नावाचा कॉलेजमधला एक टपोरी युवक आणि साधी सरळ निर्जला यांची ही लव्हस्टोरी तुफान गाजली होती. या चित्रपटातील सलमानची हेअर स्टाईलही ‘राधे कट’ नावाने ओळखली जाऊ लागली होती. सतीश कौशिक दिग्दर्शित हा सिनेमा ‘सेतु’ या तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक होता. सलमानच्या बुडत्या करिअरला या सिनेमाने आधार देणाऱ्या या सिनेमातील एक वेडी भिकारी मुलगी  तुम्हाला आठवतं असेलच. पात्र लहान होतं, पण  वेड्यांच्या इस्पितळात जाणा-या सलमानला (Salman Khan) रोखण्यासाठी त्याच्या मागे धावत सुटणारी ती वेडसर महिला आणि तो सीन पाहिल्यानंतर अनेकांचे डोळे पाणावले होते. डोळ्यांत पाणी आणणा-या त्या दृश्यातील ती वेडसर महिला दुसरी कुणी नसून एक मोठी नायिका आहे. होय, राधिका चौधरी (Radhika Chaudhari ) तिचे नाव.

‘तेरे नाम’मध्ये ती भलेही फाटक्या, मळलेल्या कपड्यात दिसली असेल. पण रिअल लाईफमध्ये ती कमालीची सुंदर आहे. हिंदीसोबतच साऊथच्या अनेक चित्रपटांत तिने काम केलेय.

राधिका चौधरी हिची फिल्मी करिअरची सुरूवात 1999 मध्ये झाली होती. आपल्या कारकिर्दीत तिने पहिल्यांदा तेलगू चित्रपटात काम केले. यानंतर पहिल्यांदा तिला ‘खुशी’ नावाच्या हिंदी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटात फरदीन खान आणि करीना कपूर मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटा नंतर राधिकाने आणखी काही चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आणि मग एक दिवस अचानक अभिनयाच्या या जगातुन गायब झाली. 

‘तेरे नाम’मध्ये राधिकाच्या वाट्याल एकही संवाद आला नाही. पण तिच्या चेह-यावरचे जिवंत भाव बघून प्रेक्षक तिच्या प्रेमात पडलेत. ‘तेरे नाम’नंतर राधिकाने अन्य एक दोन सिनेमे केलेत आणि अचानक अभिनयाला रामराम ठोकला.
यानंतर ती दिग्दर्शनाकडे वळली. 2010 मध्ये लास वेगास फिल्म फेस्टिवलमध्ये तिच्या ‘ऑरेंज ब्लॉसम’ या शॉर्ट फिल्मने सिल्व्हर ऐस अवार्ड जिंकला होता.

Web Title: throwback do you remember the beggar girl radhika from salman khan film tere naam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.