या गोष्टीमुळे जॉनी लिव्हरचे आयुष्यच बदलले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2017 11:57 AM2017-08-14T11:57:14+5:302017-08-14T17:27:14+5:30

जॉनी लिव्हर आज बॉलिवूडमधील एक यशस्वी कॉमेडियन आहे. त्याने त्याच्या आजवरच्या प्रवासातून हे सिद्ध केले आहे. आज त्याचा वाढदिवस ...

This thing changed the life of Johnny Lever | या गोष्टीमुळे जॉनी लिव्हरचे आयुष्यच बदलले

या गोष्टीमुळे जॉनी लिव्हरचे आयुष्यच बदलले

googlenewsNext
नी लिव्हर आज बॉलिवूडमधील एक यशस्वी कॉमेडियन आहे. त्याने त्याच्या आजवरच्या प्रवासातून हे सिद्ध केले आहे. आज त्याचा वाढदिवस आहे. तुम्हाला माहीत आहे का, जॉनी लिव्हरचा आजवरचा हा प्रवास सोपा नव्हता. जॉनीने इथवर पोहोचण्यासाठी प्रचंड स्ट्रगल केला आहे. 
जॉनी लिव्हरची परिस्थिती अतिशय बेताची होती. तो धारावीतील एका छोट्याशा झोपडीमध्ये राहात होता. त्याला नृत्याची आवड असल्याने तो त्याच्या परिसरात होणाऱ्या अनेक समारंभात भाग घ्यायचा. त्याच्या अंगात कला होती. पण त्याला वाव मिळत नव्हता. याविषयी जॉनी लिव्हरनेच टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. त्याने सांगितले आहे की, मी माझ्या घरातील सगळ्यात मोठा मुलगा होतो. माझ्या घरची परिस्थिती चांगली नसल्याने मला सातवीतच शाळा सोडावी लागली. माझ्या वडिलांची कमाई खूप कमी असल्याने मी १२व्या वर्षापासून नोकरी करायला सुरुवात केली. मी सहा वर्षं एका कंपनीत काम केले. तिथे मला खूपच कमी पैसे मिळायचे. पण कुटुंबाला हातभार लागतोय असा विचार करून मी हे काम करत होतो. मी लहानपणापासूनच आजूबाजूच्या लोकांना पाहून मिमिक्री करत असे. त्यामुळे नोकरी करत असतानाच मी मिमिक्री शो देखील करायला लागलो. असाच एक शो करताना कल्याणजी-आनंदजी यांना भेटण्याची मला संधी मिळाली. त्यांना माझी मिमिक्री खूप आवडल्याने त्यांनी मला त्यांच्यासोबत शो करण्याची संधी दिली. त्यामुळे मी त्यांच्यासोबत परदेशातही शो करायला लागलो. १९८० पासून मी शो करत होतो. शो मध्ये लोकांना माझी मिमिक्री आवडत असली तरी मला चित्रपटात घ्यायला कोणी तयार नव्हते. १९९२ मध्ये मला बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक मिळाला. मला मिळालेल्या संधीचे मी सोने केले आणि त्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. प्रेक्षकांनी अक्षरशः मला डोक्यावर घेतले. तोपर्यंत मला फिल्मफेअरचे अनेक पुरस्कार देखील मिळाले होते. पण २००० मध्ये माझ्या आयुष्यात एक घटना घडली आणि माझे संपूर्ण आयुष्यच बदलले. माझा मुलगा दहा वर्षांचा असताना त्याला ट्युमर झाला. त्यामुळे माझे संपूर्ण आयुष्यच उदध्वस्त झाले होते. मी चित्रपटांमध्ये काम करणे सोडले. मी वर्षातून एखादा चित्रपट आणि एखादा शो करत होते. माझ्या मुलावर उपचार सुरू होते. पण त्याचा ट्युमर दिवसेंदिवस वाढतच चालला होता. त्याच्या मानेवरच ट्युमर होता. कॉलरने तो लपवून तो शाळेत जायचा. पण त्यामुळे तो मानसिकदृष्ट्या खचत चालला होता. ट्युमरचे ऑपरेशन केल्यास त्याचा जीवही जाऊ शकतो असे डॉक्टरांनी सांगितले असल्याने आम्ही ऑपरेशनचा विचार सोडून दिला होता. पण न्यू जर्सीतील एका डॉक्टरांकडे मी त्याला २००२ मध्ये घेऊन गेलो. तेथील डॉक्टरांनी ऑपरेशनचा सल्ला दिला. पण काहीही केल्या माझी पत्नी त्यासाठी तयार नव्हती. पण पत्नीला मी ऑपरेशनसाठी तयार केले आणि केवळ तीन तासात माझे संपूर्ण आयुष्य बदलले. कारण माझ्या मुलाचे ऑपरेशन यशस्वी झाले. त्यानंतर मी दारू, धुम्रपान सगळे काही सोडून दिले. एका गोष्टीमुळे माझे संपूर्ण आयुष्य बदलले असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. 

Also Read : ​​सबसे बडा कलाकारमध्ये जॉनी लिव्हर आणि मुलगी जॅमी लिव्हर यांची जुगलबंदी

Web Title: This thing changed the life of Johnny Lever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.