-रवींद्र मोरे 
चित्रपटसृष्टीपासून राजकीय क्षेत्रात पदार्पण करणारी उर्मिला मातोंडकरने कॉँग्रेस पार्टीला नुकतीच सोडचिठ्ठी दिली. उर्मिलाने कॉँग्रेस पक्षातर्फे लोकसभा निवडणूक लढविली होती, मात्र तिला अपयश आले. ग्लॅमरस जगातून राजकारणात बऱ्याच स्टार्सने प्रवेश केला, पैकी काहींना यश तर काहींना अपयशाचा सामना करावा लागला. राजकारणात अपेक्षित यश न मिळाल्याने राजकारण सोडणाऱ्या  स्टार्सबाबत आज आपण जाणून घेऊया... 

* अमिताभ बच्चन


१९८४ मध्ये अमिताभ बच्चन यांचे इलाहाबाद मधून हेमवती नंदन बहुगुणा यांच्या विरोधात निवडणूक लढणे त्याकाळी सर्वात मोठी बातमी होती. त्यावेळी राजकीय डावपेच असे रंगले की, बोफोर्स घोटाळ्यात नाव आल्यानंतर अमिताभ बच्चन यांचा राजकारणाचा मोह भंगला आणि त्यांनी राजकारण सोडले. कधी गांधी परिवाराशी अतिशय जवळचे नातेसंबंध असलेले अमिताभ राजकारणापासून दूर गेल्याने त्यांच्यात काही प्रमाणात दूरावाही वाढला. नंतर अमिताभ बच्चन म्हटले होते की, राजकारणात जाणे त्यांची एक चुक होती आणि पून्हा कधीही राजकारणात येणार नाही, असेही ते म्हटले होते.  

* राजेश खन्ना


१९९१ च्या निवडणूकी दरम्यान अमिताभ बच्चन चित्रपट आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रापासून लांब झाले होते. त्यावेळी राजीव गांधी यांनी राजेश खन्ना यांना नवी दिल्लीमध्ये लालकृष्ण अडवाणी यांच्या विरोधात निवडणून लढण्याचा आग्रह केला होता. १९९१ च्या निवडणूकीत राजेश खन्ना आडवाणीच्या विरोधात खूपच कमी मतांनी पराभूत झाले होते. १९९२ मध्ये जेव्हा पोटनिवडणूक झाली तेव्हा राजेश खन्ना पून्हा नवी दिल्लीमधून लढले होते. मात्र राजेश खन्नाने अल्पावधीत राजकारण सोडले, कारण या क्षेत्रात ते फ्लॉप ठरले होते.  

* धर्मेंद्र


धर्मेंद्र २००४ ते २००९ दरम्यान बिकानेरमध्ये भाजपाचे खासदार होते. या दरम्यान तेथील नाखूश लोकांनी ‘आमचे खासदार हरवलेले आहेत’ असे पोस्टर लावले होते. एका मुलाखतीत धर्मेंद्र म्हटले होते की, ‘मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की, मी राजकारणात येईल. मात्र नंतर समजले की, याठिकाणी खूपच कठोर व्हावे लागते. हे पाच वर्ष माझ्यासाठी खूपच कठीण होते, शिवाय मी बिकानेरसाठी खूपच काही केले मात्र त्याचे श्रेय मला कधीही मिळाले नाही, असेही ते म्हणाले होते. त्यानंतर धर्मेंद्र यांनी राजकारणास सोडचिठ्ठी दिली.  

* गोविंदा


गोविंदाचेही राजकीय क्षेत्र फ्लॉप ठरले. २००४ मध्ये गोविंदाने कॉँग्रेसतर्फे लोकसभा निवडणूक लढविली होती. त्याने भाजपाचे मोठे नेते राम नाईकांना ५० हजार मतांनी हरवले होते. २००८ मध्ये मात्र गोविंदाने राजकारणाला सोडचिठ्ठी दिली आणि म्हटला की, आता कधीच राजकारणात येणार नाही. 

* संजय दत्त


२००९ मध्ये लोकसभा निवडणूकीत संजय दत्त लखनौमधून समाजवादी पार्टीच्या तिकिटावर राजकीय क्षेत्रात उतरले होते मात्र सुप्रिम कोर्टाने संजय दत्तला निवडणूक लढण्यास निर्बंध घातले. नंतर पार्टीने त्याला जनरल सेक्रेटरी बनविले, मात्र लवकरच संजय दत्तने राजकारणाला बाय बाय केले आणि पून्हा चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.  

Web Title: these celebs quit politics in short term

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.