धनुषच्या ‘मारी’ सिनेमातील ज्येष्ठ अभिनेते चेल्लादुराई अय्या यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 01:08 PM2021-04-30T13:08:59+5:302021-04-30T13:10:38+5:30

चेल्लादुराई बाथरूममध्ये बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांना तातडीने रूग्णालयात हलवण्यात आले. येथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Theri and Maari actor Chelladurai dies at 84 in Chennai | धनुषच्या ‘मारी’ सिनेमातील ज्येष्ठ अभिनेते चेल्लादुराई अय्या यांचे निधन

धनुषच्या ‘मारी’ सिनेमातील ज्येष्ठ अभिनेते चेल्लादुराई अय्या यांचे निधन

googlenewsNext
ठळक मुद्देआज दुपारी २ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार विधी होणार आहेत.

साऊथ इंडस्ट्रीचे ज्येष्ठ अभिनेते चेल्लादुराई अय्या यांचे काल 29 एप्रिलला निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. हृदयविकाराच्या धक्क्याने  चेन्नईतील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. (Theri and Maari actor Chelladurai dies at 84 in Chennai)
चेल्लादुराई बाथरूममध्ये बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांना तातडीने रूग्णालयात हलवण्यात आले. येथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या निधनामुळे साऊथ इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.

साऊथ सिनेसृष्टीचे जाणकार रमेश बाला यांनी चेल्लादुराई यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. ज्येष्ठ अभिनेते चेल्लादुराई अय्या यांचे चेन्नईत काल संध्याकाळी निधन झाले. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो,  अशा आशयाचे ट्वीट केले आहे.

चेल्नादुराई यांनी साऊथच्या विविध सिनेमात विविधांगी भूमिका साकारल्या़ सुपरस्टार धनुषच्या ‘मारी’ या सिनेमात त्यांनी यादगार भूमिका साकाली होती. याशिवाय सुपरस्टार विजयच्या ‘थेरी’ या सिनेमातही त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. शिवाजी यासिनेमातही त्यांनी काम केले होते.

 

 
    

Web Title: Theri and Maari actor Chelladurai dies at 84 in Chennai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.