'घरात नाही पाणी', अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगमध्ये सांगितली पाण्याची समस्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 12:11 PM2021-08-28T12:11:49+5:302021-08-28T12:12:11+5:30

अमिताभ बच्चन यांनी घरातील पाण्याची समस्या शेअर करत चाहत्यांची माफीदेखील मागितली.

'There is no water in the house', Amitabh Bachchan said in his blog | 'घरात नाही पाणी', अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगमध्ये सांगितली पाण्याची समस्या

'घरात नाही पाणी', अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगमध्ये सांगितली पाण्याची समस्या

googlenewsNext

बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रीय आहेत आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असतात. तसेच ते त्यांच्या ब्लॉगमधून अनेक मुद्द्यावर भाष्य करतात. दररोजच्या आयुष्यातील घडामोडी ते ब्लॉगमधून शेअर करत असतात. बिग बींनी नुकत्याच लिहिलेल्या ब्लॉगमध्ये घरातील एक समस्या मांडली आहे. या ब्लॉगमध्ये घरात पाणी नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगमध्ये सांगितले की जेव्हा कौन बनेगा करोडपतीच्या शूटिंगसाठी ते सकाळी ६ वाजता उठले तेव्हा त्यांच्या घरात पाणी येत नव्हते. त्यांनी सांगितले की, मी सकाळी ६ वाजता उठलो आणि पाहिले तर घरात पाणी येत नव्हते. आता परत पाणी येत नाही तोपर्यंत मला कनेक्ट होण्यासाठी वेळ मिळाला. यानंतर मी कामासाठी निघेन आणि थेट वॅनिटीमध्येच तयार होईन.


घरातील ही समस्या चाहत्यांसोबत शेअर करताना अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांची माफी देखील मागितली. ते म्हणाले की, या घरगुती समस्यांमध्ये तुम्हाला सहभागी करून घेतल्याबद्दल माफी मागतो. पण ठीक आहे आता बोलणार नाही. आजचा दिवस थोडा कठीण होता. 


यासोबत अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये चेहेरे चित्रपटाबद्दलही लिहिले आहे. हा चित्रपट काही राज्यातच प्रदर्शित होईल, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे इतर ठिकाणी चाहत्यांनी थोडा संयम राखून थिएटर सुरु होण्याची वाट पहावी असं ते म्हणाले.


अमिताभ बच्चन यांचा चेहरे चित्रपट रिलीज झाला आहे. तसेच त्यांचा झुंड चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. याशिवाय ते ब्रह्मास्त्र, मेडे, गुडबाय आणि द इंटर्न या चित्रपटात दिसणार आहे.

Web Title: 'There is no water in the house', Amitabh Bachchan said in his blog

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.