बॉलिवूडचा दबंग खान सलमानचा सुपरहिट ठरलेला चित्रपट 'किक'चा सीक्वल रसिकांच्या भेटीला येणार आहे. 'किक'मध्ये सलमान खानजॅकलिन फर्नांडिसमध्ये मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाच्या सीक्वलमध्ये जॅकलिन झळकणार असल्याचे बोलले जात होते. त्यानंतर दीपिका पादुकोणची या चित्रपटात वर्णी लागल्याचे बोलले जात होते. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार दीपिका आणि जॅकलिनही या चित्रपटात दिसणार नाही.


सिनेब्लिट्झच्या रिपोर्टनुसार, त्यांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,' दीपिका 'किक २'मध्ये दिसणार हे चुकीचे वृत्त आहे.

अद्याप निर्मात्यांना या चित्रपटाची स्क्रीप्ट फायनल करायची आहे. त्यानंतर ते या चित्रपटातील कलाकारांच्या निवडीचा विचार करणार आहेत. इतकेच नाही तर साजिद नाडियादवाला या सिनेमासाठी नवीन चेहऱ्याच्या शोधात आहे. कारण या चित्रपटाची कथा पूर्णपणे नवीन आहे. त्यामुळे नवीन जोडी प्रेक्षकांना जास्त भावेल. '


सलमान खान व साजिद नाडियादवाला यांनी बऱ्याच नवीन चेहऱ्यांना बॉलिवूडमध्ये संधी दिली आहे. त्यामुळे 'किक २'मध्ये देखील दमदार फ्रेश जोडी रसिकांना पहायला मिळेल, अशी आशा करूयात.

२०१४ मध्ये रिलीज झालेल्या 'किक'द्वारे साजिदने दिग्दर्शनात पदार्पण केले होते. आता 'किक२' साठी साजिद पुन्हा एकदा भरपूर मेहनत घेत आहे. सध्या साजिद चित्रपटाच्या पटकथेवर काम करत आहे.

जेव्हा साजिदला विचारले, की ह्या चित्रपटाचा सिक्वेल बनवण्याचे ठरल्यावर सलमान खान ची के प्रतिक्रिया होती? तेव्हा साजिद ने सांगितले ' सलमान चे रिअक्शन नेहमी शेवटी येते तो सुरवातीला हो ला हो करतो नंतर एक महिना तो स्क्रिप्ट ऐकतो आणि नंतर दोन महिन्यानंतर तो त्याची प्रतिक्रिया देतो.

साजिद पुढे म्हणतो की "सलमान जेव्हा सेट वर असतो तेव्हा तो एक सह-लेखक बनतो. आम्ही नेहमी चांगला चित्रपट बनवण्याचे प्लनिंग करतो ह्या चित्रपटाच्या पटकथेवर सध्या काम चालू आहे, ही स्क्रिप्ट पूर्ण होण्यासाठी एक वर्ष लागेल.
 


Web Title: There is no Deepika and not Jacqueline ... but it will be seen new face 'Kick 2'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.