साउथ स्टार यशच्या 'KGF 3' संदर्भात निर्मात्यांनी दिली मोठी अपडेट, म्हणाले - 'आम्ही तिसरा भाग लवकर...'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 01:56 PM2022-05-16T13:56:28+5:302022-05-16T13:56:54+5:30

'KGF 2' नंतर आता चाहते त्याच्या पुढच्या भागाची म्हणजेच 'केजीएफ चाप्टर ३' (KGF: Chapter 3) ची वाट पाहत आहेत.

The big update given by the producers regarding the 'KGF 3', said - 'We will release the third part soon ...' | साउथ स्टार यशच्या 'KGF 3' संदर्भात निर्मात्यांनी दिली मोठी अपडेट, म्हणाले - 'आम्ही तिसरा भाग लवकर...'

साउथ स्टार यशच्या 'KGF 3' संदर्भात निर्मात्यांनी दिली मोठी अपडेट, म्हणाले - 'आम्ही तिसरा भाग लवकर...'

googlenewsNext

साउथ इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता यशचा चित्रपट 'केजीएफ चाप्टर २' (KGF: Chapter 2) अजूनही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट १४ एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. ट्रेड रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर १००० कोटींचा टप्पा ओलांडला आहे आणि चित्रपटाने हिंदी बॉक्स ऑफिसवर ४२० कोटींहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटाची कमाई अजूनही सुरूच आहे. 'KGF 2' च्या यशानंतर, चाहते आता त्याच्या पुढच्या भागाची म्हणजेच 'केजीएफ चाप्टर ३' (KGF: Chapter 3) ची वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत आता चित्रपटाच्या निर्मात्याने तिसर्‍या भागाबाबत एक मोठी अपडेट शेअर केली आहे. त्यांनी सांगितले की, चित्रपट इतक्यात फ्लोअरवर जाणार नाही.

कार्यकारी निर्माते कार्तिक गौडा यांनी ट्विटरवर अधिकृत माहिती शेअर केल्यामुळे चाहते नाराज झाले आहेत. त्यांनी ट्विट केले की, 'ज्या बातम्या आहेत त्या केवळ अफवा आहेत. आमच्यासमोर बरेच प्रोजेक्ट आहेत आणि आम्ही @hombalefilms KGF 3 इतक्या लवकर सुरू करणार नाही. आम्ही जेव्हा पण चित्रपटाची सुरूवात करू तेव्हा ती मोठ्या धमाक्यासोबत होईल.


'KGF 2' च्या यशानंतर निर्मात्यांनी तिसर्‍या भागावर काम सुरू केल्याचे गेल्या काही दिवसांपासून सतत बातम्या येत होत्या. एवढेच नाही तर यशने दिग्दर्शक प्रशांत नीलसोबत चित्रपटातील काही दृश्यांवर चर्चा केली होती. विजय किरागंदूर यांनी असेही सांगितले की ते या वर्षाच्या शेवटी शूटिंग सुरू करण्यास उत्सुक आहेत. दुसरीकडे, 'KGF 2' या चित्रपटात यशसोबत संजय दत्त, रवीना टंडन, श्रीनिधी शेट्टी आणि प्रकाश राज महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. 

Web Title: The big update given by the producers regarding the 'KGF 3', said - 'We will release the third part soon ...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.