Thar Trailer : अनिल कपूर आणि हर्षवर्धनच्या थार सिनेमाचा ट्रेलर रिलीज, सस्पेन्स आणि थ्रिलरचा डबल डोस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 06:11 PM2022-04-18T18:11:08+5:302022-04-18T18:11:47+5:30

Thar Movie: 'थार' या चित्रपटात अनिल कपूर (Anil Kaapoor) आणि हर्षवर्धन (Harshvardhan Kapoor) ही बाप लेक जोडी एकत्र काम करताना दिसणार आहेत.

Thar Trailer: Anil Kapoor and Harshvardhan's Thar movie Trailer Release, Double Dose of Suspense and Thriller | Thar Trailer : अनिल कपूर आणि हर्षवर्धनच्या थार सिनेमाचा ट्रेलर रिलीज, सस्पेन्स आणि थ्रिलरचा डबल डोस

Thar Trailer : अनिल कपूर आणि हर्षवर्धनच्या थार सिनेमाचा ट्रेलर रिलीज, सस्पेन्स आणि थ्रिलरचा डबल डोस

googlenewsNext

अनिल कपूर(Anil Kapoor)चा मुलगा हर्षवर्धन कपूर(Harshvardhan Kapoor)ने २०१६ साली 'मिर्झिया' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तो आता नवीन चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव आहे थार (Thar Movie). या चित्रपटात बाप लेक एकत्र काम करताना दिसणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये दोघेही खूपच इंटरेस्टिंग दिसत आहेत.

या थ्रिलर चित्रपटात अनिल कपूर आणि हर्षवर्धन कपूर यांच्यासोबत फातिमा सना शेख महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे स्ट्रीमिंग नेटफ्लिक्सवर ६ मेपासून सुरू होणार आहे. हा चित्रपट राज सिंह चौधरी दिग्दर्शित असून यात अनिल कपूर पोलीस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. तर हर्षवर्धन स्मगलरच्या भूमिकेत दिसणार आहे.


ट्रेलरची सुरुवात एका ओसाड वाळवंटात अनिल कपूर आणि सतीश यांच्या खुनाच्या तपासापासून होते. काही वेळातच ट्रेलरमध्ये हर्षवर्धन या अँटीक व्यावसायिकाची एन्ट्री पाहायला मिळते. पण त्याच्या आगमनानंतर त्याच्या कथेत सस्पेन्स येतो. दुसरीकडे, फातिमा एका राजस्थानी मुलीच्या पात्रात दिसते, जी हर्षवर्धनच्या व्यक्तिमत्त्वाने खूप प्रभावित आहे. आता या प्रदेशाला हादरवून सोडणाऱ्या मृत्यूला जबाबदार कोण असेल हे पाहायचे आहे. ट्रेलरमध्ये अनेक ट्विस्ट आणि टर्न दाखवण्यात आले आहेत, त्यामुळे प्रेक्षक या चित्रपटाबाबत खूप उत्सुक आहेत.


थारचा ट्रेलर अनिल कपूरची मुलगी आणि हर्षवर्धनची बहीण सोनम कपूरनेही तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. ट्रेलर शेअर करताना सोनम कपूर लिहिले, "... हा चित्रपट एखाद्या वाईट व्यक्तीबद्दल नाही. कदाचित या सगळ्यामागे कोणीतरी चांगली व्यक्ती आहे. किंवा कोणास ठाऊक? या घटनांमागे नायिका असेल? थार, ६ मे रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होईल. "

Web Title: Thar Trailer: Anil Kapoor and Harshvardhan's Thar movie Trailer Release, Double Dose of Suspense and Thriller

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.