telugu tv actress viswa santhi found dead in hyderabad residence | राहत्या घरी संशयास्पद स्थितीत आढळला अभिनेत्रीचा मृतदेह

राहत्या घरी संशयास्पद स्थितीत आढळला अभिनेत्रीचा मृतदेह

ठळक मुद्देविश्वशांती मुळची विशाखापट्टनमची राहणारी होती.

तेलगू इंडस्ट्रीत काम करणारी टीव्ही अँकर व अभिनेत्री विश्वशांती संशयास्पद स्थितीत मृतावस्थेत आढळली. तिच्या हैदराबादेतील राहत्या घरी तिचा मृतदेह आढळून आला.
विश्वशांती हैदराबादेतील एल्लारेड्डी गुडा इंजिनिअर्स कॉलनीत राहायची. तिच्या मृत्यूची बातमी कळताच सर्वत्र खळबळ माजली.

मीडिया रिपोर्टनुसार, विश्वशांती गुरुवारी सकाळी मृतावस्थेत आढळली. पाचव्या मजल्यावर ती राहायची. तीन-चार दिवस घराबाहेर न पडल्याने तिच्या शेजा-यांनी पोलिसांना सूचना दिली. पोलिस घराचा दरवाजा तोडून आत शिरले असता विश्वशांतीचा मृतदेह आढळून आला.

तिच्या मृत्यूमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
विश्वशांती मुळची विशाखापट्टनमची राहणारी होती. तिने अनेक तेलगू मालिका व शोमध्ये काम केले. अर्थात यातील बहुतेक भुमिका सहाय्यक अभिनेत्रीच्या होत्या.

Web Title: telugu tv actress viswa santhi found dead in hyderabad residence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.