telugu actor rajasekhar car accident escapes with minor injuries | कार अपघातातून थोडक्यात बचावला साऊथचा हा दिग्गज अभिनेता
कार अपघातातून थोडक्यात बचावला साऊथचा हा दिग्गज अभिनेता

ठळक मुद्दे2017 मध्येही राजा शेखर यांना अपघात झाला होता.

साऊथचा दिग्गज अभिनेते राजाशेखर वरदराजन कार अपघातातून थोडक्यात बचावले. अपघातात त्यांना किरकोळ इजा झाली.
तीन दशकांच्या दीर्घ करिअरमध्ये राजाशेखर यांनी साऊथच्या अनेक हिट चित्रपटांत काम केले. याशिवाय सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे तीन फिल्म फेअर पुरस्कारही जिंकले. 
राजाशेखर यांनी स्वत: या अपघाताची माहिती दिली. राजाशेखर रामोजी फिल्म सिटीतून घरी परतत असताना त्यांच्या कारला अपघात झाला.   गाडीचे चाक पंक्चर झाल्याने हा अपघात झाल्याचे कळतेय.

राजाशेखर यांनी या अपघाताचा मुद्दा न बनवण्याची विनंती केली आहे. हा एक किरकोळ अपघात होता. मी स्वत: कार चालवत होतो. अप्पा जंक्शनजवळ माझ्या कारला अपघात झाला. काही लोकांनी मला गाडीतून बाहेर काढले. गाडीतून बाहेर पडल्यानंतर मी सर्वप्रथम पोलिसांनी आणि नंतर पत्नीला फोन केला. पण मी सुरक्षित आहे, असे त्यांनी मीडियाला सांगितले. अर्थात पोलिसांनी याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. गाडी चालवताना राजाशेखर यांनी मद्याचे सेवन तर केले नव्हते ना, याची खातरजमा पोलिस करत आहेत.

2017 मध्येही राजा शेखर यांना अपघात झाला होता. राजाशेखर हे टॉलिवूडच्या मुव्ही असोसिएशनचे उपाध्यक्ष व सरचिटणीस आहेत. तीस वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी 80 पेक्षा अधिक चित्रपटांत काम केले.
 

Web Title: telugu actor rajasekhar car accident escapes with minor injuries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.