टॅक्सी ड्रायव्हरला अभिनेत्रीची छेड काढणं पडलं महागात, आरोपीला झाली अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 06:05 PM2020-09-15T18:05:37+5:302020-09-15T18:06:08+5:30

कोलकातामधील एका टॅक्सी ड्रायव्हरने एका अभिनेत्रीची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Taxi driver molested actress, accused arrested | टॅक्सी ड्रायव्हरला अभिनेत्रीची छेड काढणं पडलं महागात, आरोपीला झाली अटक

टॅक्सी ड्रायव्हरला अभिनेत्रीची छेड काढणं पडलं महागात, आरोपीला झाली अटक

googlenewsNext

अभिनेत्री ते खासदार असा प्रवास करणाऱ्या मिमी चक्रवर्ती यांच्यासोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. कोलकातामधील टॅक्सी ड्रायव्हरने त्यांची छेड काढल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. टॅक्सी ड्रायव्हरवर मिमी चक्रवर्ती यांनी अश्लील कमेंट्स केल्याचा आरोप केला आहे. ही घटना सोमवारी दुपारी कोलकातामधील बालीगंज येथे घडली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मिमी चक्रवर्ती जेव्हा जिममधून परतत होत्या त्यावेळी टॅक्सी ड्रायव्हरने त्यांच्यावर अश्लील कमेंट्स केल्या. मिमी यांची गाडी ओव्हरटेक केल्यानंतर पुन्हा त्याने ही कृती केली. त्यानंतर मिमी यांनी त्याचा पाठलाग केला आणि त्याला पकडले.


मिमी चक्रवर्ती यांनी सांगितले की, मी माझ्या कारमध्ये होती तेव्हा मी पाहिले की माझ्या कारच्या शेजारी असलेला एक टॅक्सी ड्रायव्हर मला इशारे करत होता. आधी मी दुर्लक्ष केले. त्यानंतर त्याने माझ्या कारला ओव्हरटेक केले आणि मग त्याने हे पुन्हा केले. मला वाटले की जर मी त्याच्या या वर्तणूकीकडे दुर्लक्ष केले तर दुसरी महिला त्याच्या अत्याचाराला बळी पडेल. ती महिला या टॅक्सी ड्रायव्हरच्या कॅबमध्ये सुरक्षित नाही.


मिमी चक्रवर्ती यांनी गरियाहाट पोलिस स्टेशनमध्ये टॅक्सी ड्रायव्हरच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. या टॅक्सी ड्रायव्हरचे नाव आहे लक्ष्मण यादव. त्याला कलम ३४५, ३५४ अ, ३५४ ड, ५०९ सहित भारतीय दंड संहितेच्या इतर कलमांतर्गत अटक करण्यात आली आहे.


मिमी चक्रवर्ती त्रिणमूल काँग्रेसच्या खासदार असून बंगाली चित्रपटातील टॉपच्या अभिनेत्री आहेत. मार्च २०२०मध्ये त्या लंडनमध्ये आगामी चित्रपट बाजीच्या शूटिंगदरम्यान १४ दिवसांसाठी घरी क्वारंटाइन होती. आता ती लंडनहून घरी परतली आहे.

Web Title: Taxi driver molested actress, accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.