ठळक मुद्दे‘जब वी मेट’ या सिनेमानंतर जवळजवळ 13 वर्षांनी तरूण बॉलिवूडमध्ये कमबॅक करतोय.

2007 मध्ये प्रदर्शित झालेला ‘जब वी मेट’ हा सिनेमा कोणाला आठवत नाही?  नाव घेताच या सिनेमाची सगळी पात्र डोळ्यासमोर येतात. करिनाने रंगवलेली गीत, शाहिद कपूरने साकारलेला आदित्य डी कश्यप हे दोन चेहरे तर हमखास नजरेसमोर येतात. याशिवाय या सिनेमातील आणखी एक चेहरा आठवतो. तो म्हणजे अंशुमनचा. होय, ज्या अंशुमनसाठी गीत घरदार सोडून पळून जाते आणि शेवटी तोच तिला नाकारतो. अंशुमनची ही भूमिका तरूण राज अरोराने साकारली होती. हा तरूण राज अरोरा लवकरच ‘लक्ष्मी बॉम्ब’ या अक्षय कुमारच्या सिनेमात दिसणार आहे. पण आजही लोक त्याला ‘अंशुमन’ म्हणूनच ओळखतात. अगदी आजही  तू गीतला धोका का दिलास? असा प्रश्न त्याला केला जातो.

बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत तरूण राज अरोराने ‘अंशुमन’ या भूमिकेबद्दल बोलला. तो म्हणाला, ‘जब वी मेट’मधील अंशुमन या भूमिकेमुळे अनेक लोक आजही माझा द्वेष करतात. पण याच भूमिकेमुळे मी आजही लोकांच्या लक्षात आहे. आजही लोक मला अंशुमन म्हणून हाक मारतात. तू गीतला ऐनवेळी धोका का दिलास? असा प्रश्न आजही अनेक मुली मला करतात. माझ्याकडे या प्रश्नाचे उत्तर नसते. पण आता कदाचित मला या प्रश्नाचे उत्तर शोधायला हवे.
‘जब वी मेट’साठी मला एकदिवस इम्तियाज अलींचा फोन आला आणि पुढच्या 20 मिनिटात हा सिनेमा मी साईन केला होता, असेही त्याने सांगितले.

आपको गन्ने के खेत देखने हैं की नहीं?
‘जब वी मेट’ या सिनेमात ‘क्यों देखूं मैं गन्ने के खेत?’ अशा एक डायलॉग अंशुमनच्या तोंडी आहे. या डायलॉगवरूनही लोक तरूणची मजा घेतात. आपको गन्ने के खेत देखने हैं की नहीं? असा मजेदार प्रश्न विचारतात.

13 वर्षांनंतर कमबॅक
‘जब वी मेट’ या सिनेमानंतर जवळजवळ 13 वर्षांनी तरूण बॉलिवूडमध्ये कमबॅक करतोय. ‘जब वी मेट’नंतर तरूणने बॉलिवूडमधून बे्रक घेतला होता. यादरम्यान तो मुंबईहून बेंगळुरूला शिफट झाला होता आणि येथे त्याने स्वत:चा हॉस्पिटॅलिटी बिझनेस सुरु केला होता. आता मात्र तरूण पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये परततोय.

बेबो झोपण्यापूर्वी काय करते?, त्यावर पती सैफचं उत्तर ऐकून कावरीबावरी झाली करीना, पहा हा व्हिडीओ

शाहिद कपूरला पसंत नव्हती करिना कपूरसोबत त्याची जोडी, ब्रेकअपनंतर केला धक्कादायक खुलासा

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: tarun raj arora who played anshuman in jab we met all set to make a comeback in laxmmi bomb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.