लग्नाच्या प्रश्नावरून संतापली तापसी पन्नू; दिले रोखठोक उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2018 02:35 PM2018-03-03T14:35:47+5:302018-03-03T20:06:49+5:30

‘पिंक’सारख्या उत्कृष्ट चित्रपटामध्ये आपल्या दमदार अभिनयाची झलक दाखविणारी अभिनेत्री तापसी पन्नू लवकरच ‘दिल जंगली बंदेया’ या चित्रपटात बघावयास मिळणार ...

Tapasi Pannu, angry over the marriage question; Given the answer! | लग्नाच्या प्रश्नावरून संतापली तापसी पन्नू; दिले रोखठोक उत्तर!

लग्नाच्या प्रश्नावरून संतापली तापसी पन्नू; दिले रोखठोक उत्तर!

googlenewsNext
िंक’सारख्या उत्कृष्ट चित्रपटामध्ये आपल्या दमदार अभिनयाची झलक दाखविणारी अभिनेत्री तापसी पन्नू लवकरच ‘दिल जंगली बंदेया’ या चित्रपटात बघावयास मिळणार आहे. सध्या ती या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. मात्र याच दरम्यान, तापसीसोबत असे काही घडले ज्यामुळे तिच्या रागाला पारावार उरला नाही. तिने ट्विटरच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला. त्याचे झाले असे की, एका इंग्रजी न्यूज वेबसाइटने तापसी पन्नूला ट्विटच्या माध्यमातून एका बातमीत ‘तापसी पन्नूने लग्नासाठी होकार दिला काय?’ असा प्रश्न विचारला. या बातमीची लिंकही शेअर केली. ज्यावर तापसी पन्नू अशी काही संतापली की, तिने एकदम रोखठोक असे उत्तर देणे पसंत केले. 

न्यूज वेबसाइटच्या या बातमीवर तापसीने एक सल्ला दिला की, अशाप्रकारच्या बातम्या प्रसिद्ध करण्यापेक्षा वास्तविक न्यूज देत जा. दरम्यान, या अगोदरही चित्रपटाच्या प्रमोशनवरून ‘तापसी पन्नूला लग्नावरून तरुणांची चिंता’ अशा आशयाची एक स्टोरी पोस्ट केली होती. याच पोस्टची वेबसाइटने एक बातमी बनविली अन् त्या अनुषंगाने ट्विट केले. ज्यामुळे तापसीचा चांगलाच संताप झाला. 

दरम्यान, तापसी पन्नूने तिच्या करिअरची सुरुवात दक्षिण भारतीय चित्रपटांमधून केली. पुढे ती बॉलिवूडमध्ये स्थिरावण्याचा प्रयत्न करीत आहे. दिग्दर्शक डेविड धवन यांनी तिला ‘चश्मेबद्दूर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये संधी दिली. मात्र तिला खरी ओळख शूजित सरकार यांच्या ‘पिंक’ या चित्रपटातून मिळाली. तापसी आगामी ‘दिल जंगली बंदेया’ या चित्रपटात बघावयास मिळणार असून, तिचा हा चित्रपट ९ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: Tapasi Pannu, angry over the marriage question; Given the answer!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.