ठळक मुद्देकाजोलने नुकताच तिच्या सोशल नेटवर्किंग साईटवर तिच्या आईचा फोटो शेअर केला असून आईच्या तब्येतीसाठी ज्या लोकांनी प्रार्थना केल्या, त्यांचे सगळ्यांचे मी आभार मानते असे लिहिले आहे.

काजोलची आई ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांची प्रकृती अचानक खलावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुंबईतील लीलावती रूग्णालयाच्या बाहेर काजोलला पाहाण्यात आल्यानंतर तनुजा या रुग्णालयात दाखल असल्याचे सगळ्यांना कळले होते. 

तनुजा यांना डायव्हर्टिक्यूलीस नावाचा आजार झाला होता. डायव्हर्टिक्यूलीस हा आजार पोटाशी संबंधीत आहे. गेल्या महिन्यात देखील तनुजा यांची प्रकृती बिघडली होती आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. डायव्हर्टिक्यूलीस हाया आजारावर नुकतीच सर्जरी करण्यात आली असून त्यांच्या प्रकृतीमध्ये आता सुधारणा होत आहे. काजोलने नुकताच तिच्या सोशल नेटवर्किंग साईटवर तिच्या आईचा फोटो शेअर केला असून आईच्या तब्येतीसाठी ज्या लोकांनी प्रार्थना केल्या, त्यांचे सगळ्यांचे मी आभार मानते असे लिहिले आहे.

काजोलने शेअर केलेल्या या फोटोत तनुजा खूपच अशक्त दिसत असून त्यांचे वजन कित्येक किलो कमी झाले असल्याचे हा फोटो पाहून आपल्या लगेचच लक्षात येत आहे. पण तनुजा यांच्या चेहऱ्यावर एक खूप छान हास्य पाहायला मिळत आहे. या फोटोत काजोल आणि तनुजा या हसताना दिसत असून हा फोटो तनुजा आणि काजोल यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांनी ज्वेलथीफ, दो चोर, मेरे जीवन साथी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्या गेली अनेक वर्षं चित्रपटसृष्टीत कार्यरत असून त्यांनी एकापेक्षा एक दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी काही वर्षांपूर्वी पितृऋण या मराठी चित्रपटात काम केले होते. 

तनुजा यांचे पती शोमू मुखर्जी हे प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक होते. काही वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. तनुजा आणि शोमू यांना काजोल आणि तनिषा अशा त्यांना दोन मुली असून काजोल त्या दोघींमध्ये मोठी आहे. अभिनेता काजोल ही अजय देवगणची पत्नी असून अजयच्या वडिलांचे म्हणजेच स्टंट डायरेक्टर वीरू देवगण यांचे काहीच दिवसांपूर्वी निधन झाले.  


Web Title: Tanujja surgery was successful, Kajol shared his mother's photo with information about health
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.