छिपाना भी नहीं आता, दिखाना भी नहीं आता...! कपड्यांमुळे ट्रोल झाली तमन्ना भाटिया

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 03:12 PM2021-06-15T15:12:27+5:302021-06-15T15:13:03+5:30

युजर्सच्या नको त्या कमेंट्स...; काल रात्री तमन्ना एअरपोर्टवर स्पॉट झाली आणि तिचा लूक पाहून अनेकांनी तिला ट्रोल करणे सुरू केले.

Tamannaah Bhatia trolled for her outfit which she wore at airport | छिपाना भी नहीं आता, दिखाना भी नहीं आता...! कपड्यांमुळे ट्रोल झाली तमन्ना भाटिया

छिपाना भी नहीं आता, दिखाना भी नहीं आता...! कपड्यांमुळे ट्रोल झाली तमन्ना भाटिया

googlenewsNext
ठळक मुद्देएकामागून एक अनेक ब्लॉकबस्टर सिनेमा देणारी तमन्ना आता हिंदी चित्रपटसृष्टी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय नाव ठरले आहे.

हिंदीसह दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने रसिकांना वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia). साऊथ इंडस्ट्रीत तमन्ना हे एक खूप मोठं नाव आहे. बॉलिवूडमध्येही तिने जम बसवलाये. पण तूर्तास ही तमन्ना ट्रोल होतेय. कशासाठी तर फॅशनसाठी. होय, काल रात्री तमन्ना एअरपोर्टवर स्पॉट झाली आणि तिचा लूक पाहून अनेकांनी तिला ट्रोल करणे सुरू केले.
 एअरपोर्टवर तमन्ना आईसोबत दिसली.  क्रॉप टॉप, ट्राउझर पॅन्ट, तोंडावर मास्क अशा कॅज्युअल लूकमध्ये ती दिसली. पण चर्चा झाली ती तिच्या आगळ्यावेगळया टॉपची. होय, तिचा हा टॉप पाहून युजर्सनी नको त्या कमेंट्स केल्यात. (Tamannaah Bhatia trolled for her outfit)

(फोटो - इन्स्टंटबॉलिवूड)

अरे ही टी-शर्ट खाली करायला विसरली कदाचित, असे एका युजरने लिहिले. एका युजरने तर ‘छिपाना भी नहीं आता, दिखाना भी नहीं आता,’ म्हणत तमन्नाची खिल्ली उडवली. हे काय कपडे आहेत, जितके श्रीमंत तितकेच गरीब, अशी कमेंट एका युजरने केली. अनेकांना तमन्नाचे कपडे पाहून दिशा पाटनीही आठवली. काही दिवसांपूर्वी अशाच एका टॉपमुळे दिशा जबरदस्त ट्रोल झाली होती.

2005 साली रुपेरी पडद्यावर झळकलेल्या ‘चाँद सा रोशन चेहरा’ या सिनेमातून तमन्नाने अभिनयाच्या क्षेत्रात पहिलं पाऊल ठेवलं. मात्र तिचा पहिलाच सिनेमा तिकीटखिडकीवर आपटला. सिनेमाला रसिकांनी नाकारल्याने तमन्नाने आपला मोर्चा दाक्षिणात्य सिनेमाकडे वळवला.

 (फोटो - इन्स्टंटबॉलिवूड)

दक्षिणेकडील सिनेमात तिची प्रत्येक तमन्ना म्हणजेच इच्छा पूर्ण झाली. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत तमन्ना नाव चांगलंच हिट ठरलं, तिच्या सिनेमांना दक्षिणेकडील डोक्यावर घेतलं. तिथल्या बड्या स्टार्ससह तिने रुपेरी पडदा गाजवला.  एकामागून एक अनेक ब्लॉकबस्टर सिनेमा देणारी तमन्ना आता हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय नाव ठरले आहे.  

Web Title: Tamannaah Bhatia trolled for her outfit which she wore at airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.