तैमूरच्या करिअरबाबत पहिल्यांदाच बोलली करिना, म्हणाली - 'त्याला त्याचा मार्ग शोधावा लागेल'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 11:32 AM2020-09-05T11:32:52+5:302020-09-05T11:37:33+5:30

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर हा वाद अधिक पेटला आणि लोक सोशल मीडियावर नेपोटिज्मवरून सेलिब्रिटींना ट्रोल करू लागले. आता नुकतीच करिना कपूरने नेपोटिज्म आणि तैमूरवर वक्तव्य केलं आहे.

Taimur has to find his own path says Kareena Kapoor Khan on Nepotism | तैमूरच्या करिअरबाबत पहिल्यांदाच बोलली करिना, म्हणाली - 'त्याला त्याचा मार्ग शोधावा लागेल'

तैमूरच्या करिअरबाबत पहिल्यांदाच बोलली करिना, म्हणाली - 'त्याला त्याचा मार्ग शोधावा लागेल'

googlenewsNext

करण जोहरचा चॅट शो हा कंगना रणौतने फिल्म इंडस्ट्रीमध्ये नेपोटिज्मला प्रोत्साहन देणारा असल्याचं म्हटलं होतं. यानंतरच बॉलिवूडमध्ये नेपोटिज्मचा वाद सुरू झाला होता. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर हा वाद अधिक पेटला आणि लोक सोशल मीडियावर नेपोटिज्मवरून सेलिब्रिटींना ट्रोल करू लागले. आता नुकतीच करिना कपूरने नेपोटिज्म आणि तैमूरवर वक्तव्य केलं आहे.

फिल्म क्रिटीक अनुपमा चोप्राला दिलेल्या एका मुलाखतीत करिना म्हणाली की, प्रत्येकाला ते सगळं मिळतं ज्याच्या ते लायक असतात आणि ते त्यांच्या नशीबात लिहिलेलं असतं. तैमूरबाबत ती म्हणाली की, 'असं अजिबात नाहीये की, तैमूर देशातील सर्वात मोठा स्टार बनणार आहे. तो कदाचित देशातील असा मुलगा आहे ज्याचे सर्वात जास्त फोटो काढले गेले. त्याच कारण काहीही असो, मला नाही माहीत. मलाही माझ्या मुलाबाबत वाटतं की, तो आत्मनिर्भर व्हावा. त्याला आयुष्यात जे करायचं असेल ते त्यांने करावं. होऊ शकतं की, त्याला शेफ बनायचं असेल किंवा पायलट, त्याला जे करायचं असेल ते त्याने करावं'.

तैमूरबाबत पुढे करिना म्हणाली की, 'माझी अशी इच्छा आहे की, तैमूरने आपल्या आयुष्यात आनंदी रहावं. हे गरजेचं नाही की, त्याचे पॅरेंट्स यशस्वी झाले म्हणून तोही होईल. त्याचा प्रवास तेव्हा सुरू होईल जेव्हा त्याची इच्छा असेल. त्याला त्याचा मार्ग स्वत: शोधावा लागेल. यात त्याचे पॅरेंट्स त्याची कोणत्याही प्रकारची मदत करणार नाहीयेत'.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी करिना कपूर खानने दुसऱ्यांदा गोड बातमी दिली. सोबतच तिने कामालाही सुरूवात केली आहे. तर दुसरीकडे सैफ अली खान याला प्रभासची मुख्य भूमिका असलेल्या 'आदिपुरूष'मध्ये लंकेशची भूमिका मिळाली आहे. या सिनेमाचा दिग्दर्शक ओम राऊतसोबत त्याने 'तान्हाजी' सिनेमातही व्हिलनची भूमिका साकारली होती.

हे पण वाचा :

'आदिपुरूष'मध्ये सैफ साकारणार रावणाची भूमिका, यावर करिनाने तिच्या स्टाईलने दिली प्रतिक्रिया!

करिनासोबत काम करणा-यांची होणार कोरोना चाचणी, प्रेग्नंसीमुळे घेतली जाते अधिक खबरदारी

तैमुरनं विराजमान केले गणपती बाप्पा, शांतता अन् सर्वांच्या आरोग्यासाठी प्रार्थना

प्रेग्नेंसीमध्ये कामवर परतली करिना कपूर, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Web Title: Taimur has to find his own path says Kareena Kapoor Khan on Nepotism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.