OMG! करोडोची कमाई करणाऱ्या दीपिका पादुकोणला या गोष्टीची करायचीय चोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 05:49 PM2020-02-29T17:49:42+5:302020-02-29T17:50:53+5:30

दीपिका पादुकोणने ही गोष्ट सांगितल्यानंतर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Taimur Ali Khan leaves Deepika Padukone and Alia Bhatt gushing PSC | OMG! करोडोची कमाई करणाऱ्या दीपिका पादुकोणला या गोष्टीची करायचीय चोरी

OMG! करोडोची कमाई करणाऱ्या दीपिका पादुकोणला या गोष्टीची करायचीय चोरी

googlenewsNext
ठळक मुद्देदीपिका पादुकोणने या व्हिडिओवर कमेंट करत मला याला चोरायचे आहे असे लिहिले आहे तर आलिया भटने ओएमजी असे लिहिले आहे. केवळ सामान्य लोकांमध्येच नव्हे तर बॉलिवूडमधील स्टारमध्ये देखील तैमुरची चांगलीच क्रेझ आहे.  

सैफ अली खान आणि करिना कपूरचा तैमुर हा त्यांच्या दोघांपेक्षा देखील फेमस आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. तैमुर हा लहानवयातच स्टार बनला आहे. तो कुठेही जातो, तिथे प्रसारमाध्यमांचे कॅमेरे त्याच्यामागे फिरत असतात. तैमुर हा मीडियाचा प्रचंड फेव्हरेट बनला आहे. त्याला प्रचंड फॅन फॉलॉव्हिंग असून तैमुरच्या फॅन्सने त्याचे फोटो पोस्ट करण्यासाठी इन्स्टाग्रामवर अनेक अकाऊंटस देखील बनवली आहेत.

तैमुर सोशल मीडियावर प्रचंड प्रसिद्ध असून त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ सामान्य लोकांनाच नव्हे तर सेलिब्रेटींना देखील प्रचंड आवडत आहे. सैफ अली खान आणि करिना कपूरने नुकतेच एका जाहिरातीसाठी चित्रीकरण केले. या चित्रीकरणासाठी त्यांच्यासोबत तैमुर देखील उपस्थित होता. त्यावेळी काढण्यात आलेला हा व्हिडिओ आहे.

तैमुरचा हा व्हिडिओ सेलिब्रेटी हेअरस्टायसिस्टने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या चित्रीकरणाच्यादरम्यान तैमुरचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळत आहे. या व्हिडिओत तैमुर ब्लो ड्रायर गन हातात घेऊन उभा असल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडिओसोबत असिस्टंट की बॉस अशी कॅप्शन त्या सेलिब्रेटी हेअरस्टायसिस्टने दिली आहे. या व्हिडिओचीच सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. या व्हिडिओत तैमुर खूपच क्यूट दिसत असल्याचे सामान्यांचे म्हणणे आहे. पण त्याचसोबत काही सेलिब्रेटींनी देखील या व्हिडिओवर कमेंट केली आहे.

दीपिका पादुकोणने या व्हिडिओवर कमेंट करत मला याला चोरायचे आहे असे लिहिले आहे तर आलिया भटने ओएमजी असे लिहिले आहे. केवळ सामान्य लोकांमध्येच नव्हे तर बॉलिवूडमधील स्टारमध्ये देखील तैमुरची चांगलीच क्रेझ आहे.  

Web Title: Taimur Ali Khan leaves Deepika Padukone and Alia Bhatt gushing PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.