ठळक मुद्देतापसीने इन्स्टाग्रामवर पोस्टसोबत लिहिले आहे की, खेळ हा माझ्या आयुष्याचा नेहमीच अविभाज्य घटक राहिला आहे. शाळेत माझ्यासाठी नेहमीच धावण्याचे मैदान हे एखाद्या युद्ध क्षेत्रासारखेच असायचे.

अभिनेत्री तापसी पन्नूने तिच्या लहानपणीचा एक फोटो नुकताच तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर शेअर केला आहे. हा फोटो तिच्या शालेय जीवनातील असून तिने या फोटोसोबत खूपच छान संदेश लिहिला आहे. तापसीचा हा फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडत असून या फोटोवर ते मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत. 

तापसीने इन्स्टाग्रामवर पोस्टसोबत लिहिले आहे की, खेळ हा माझ्या आयुष्याचा नेहमीच अविभाज्य घटक राहिला आहे. शाळेत माझ्यासाठी नेहमीच धावण्याचे मैदान हे एखाद्या युद्ध क्षेत्रासारखेच असायचे. मला खेळात प्रोत्साहन दिल्याबद्दल आणि पाठिंबा दिल्याबद्दल माझ्या पालकांचे मी धन्यवाद मानते. माझ्या शालेय जीवनात माझ्या खेळात मला सहकार्य केल्याबद्दल माझ्या शाळेतील शिक्षकांचे देखील खूप सारे आभार. माझ्या शिक्षकांमुळेच मला जिंकण्याची सवय लागली. काही मुलांना कुटुंबाकडून, शिक्षकांकडून पाठिंबा मिळत नाही हे अतिशय वाईट आहे. यासोबतच तिने व्हाय द गॅप हा हॅशटॅग दिला आहे.

तापसीने ही पोस्ट ट्विंकल खन्नाने केलेल्या पोस्टनंतर केली आहे. ट्विंकलने तिच्या इन्स्टाग्रामवर तिचा शालेय जीवनातील एक फोटो पोस्ट करत इतर सेलिब्रेटींना देखील त्यांचे शालेय जीवनातील फोटो पोस्ट करण्याबाबत आव्हान केले होते. 

तापसीचा हा शाळेच्या ड्रेसमधील फोटो तिच्या चाहत्यांना चांगलाच आवडत आहे. विशेष म्हणजे या फोटोत तिने बूटांचे लेस ज्या पद्धतीने बांधले आहेत, यावर तिचे फॅन्स कमेंट करत आहे. एवढेच नव्हे तर बॉलिवूडमधील सेलिब्रेटीदेखील तिच्या या फोटोवर कमेंट करत आहेत. मनमर्जिया या चित्रपटातील तापसी पन्नूचा सहकलाकार विकी कौशलने कमेंट करत म्हटले आहे की, तू नक्कीच दोन-चार लोकांना धक्के नक्कीच मारले असतील तर टायगर श्रॉफची आई अनीता श्रॉफने लिहिले आहे की, ही लेस बांधण्याची पद्धत... तर अनुराग कश्यपने तापसीला म्हटले आहे की, कोणता तरी पुरस्कार तुला मिळालाच... तर शोभितने तापसीच्या लेस बांधण्याच्या पद्धतीवर लिहिले आहे की, अशाप्रकारे लेस बांधण्याची स्टाईल पुन्हा एकदा परत आली पाहिजे. 

Web Title: Taapsee Pannu shares adorable throwback picture in school uniform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.