तापसी पन्नूने एका वयोवृद्ध महिलेला दिले जीवदान, वाचून तुम्हीही कराल कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 10:59 AM2021-03-28T10:59:59+5:302021-03-28T11:00:19+5:30

होय, सध्या सोशल मीडियावर सर्वजण तापसीवर कौतुकाचा वर्षाव करत आहे. कारणही तसे आहे.

taapsee pannu donates platelets to elderly woman tillotama shome praises her on social media | तापसी पन्नूने एका वयोवृद्ध महिलेला दिले जीवदान, वाचून तुम्हीही कराल कौतुक

तापसी पन्नूने एका वयोवृद्ध महिलेला दिले जीवदान, वाचून तुम्हीही कराल कौतुक

googlenewsNext
ठळक मुद्देया महिन्याच्या सुरुवातीला तापसीच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला होता. यामुळे ती चर्चेत आली होती.

आयकर विभागाच्या छाप्यामुळे चर्चेत आलेली बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू सध्या आणखी एका कारणामुळे चर्चेत आहे. होय, सध्या सोशल मीडियावर तापसीवर सर्वजण कौतुकाचा वर्षाव करत आहे. कारणही तसे आहे. तापसीने एका वयोवृद्ध महिलेला जीवदान दिले आहे.
अभिनेत्री तिलोत्तमा हिने एक ट्विट केले आणि तापसीच्या या कौतुकास्पद कामाची चर्चा सुरू झाली. तिलोत्तमाने लिहिले, ‘मी कधी तापसीसोबत काम केलेले नाही. पण ती खूप मेहनती आहे, हे मला माहित आहे. मात्र ती इतकी महान आहे, हे मला माहित नव्हते. तापसीने तिच्या प्लेटलेट्स डोनेट करण्याचे महान काम केले. तापसी तुला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन.’

तापसीने तिलोत्तमाच्या या ट्विटला उत्तर देत लिहिले, ‘ मला एखाद्याचा जीव वाचवण्याची संधी मिळाली असताना मी तो जीव वाचवणार नाही, असे शक्य नाही. माझ्या स्वत:साठीही ही सर्वात मोठी उपलब्धी आहे आणि तुझे प्रेम  मला असेच मिळत राहो.’
तापसी ही तिच्या परखड स्वभावासाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असलेली तापसी देशातील विविध राजकीय व सामाजिक मुद्यांवर आपले मत मांडताना दिसते.


या महिन्याच्या सुरुवातीला तापसीच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला होता. यामुळे ती चर्चेत आली होती. मी काहीही चुकीचे केले असेल तर ते समोर येईलच आणि दोषी आढळल्यास मला शिक्षाही होईलच, असे तापसी या कारवाईवर प्रतिक्रिया देताना म्हणाली होती.आयकर विभागाचा छापा पडला, त्यांनी प्रक्रियेनुसार सर्व कारवाई केली आणि यादरम्यान मी अधिका-यांना सवोर्तोपरी सहकार्य केले. त्यांना हव्या त्या प्रश्नांची उत्तरे दिलीत. त्यांनी त्यांचे काम केले आणि ते निघून गेलेत. अचानक अशी काही कारवाई होते, तेव्हा क्षणभर गोंधळ उडतो. एका क्षणासाठी मी सुद्धा गोंधळले होते. पण नंतर ही प्रक्रिया आहे आणि  कायद्यानुसार ही प्रकिया पार पडत असेल तर सहकार्य करण्यात काहीही गैर नाही, असा विचार करून मी या कारवाईला सामोरे गेले, असे तिने एका मुलाखतीत स्पष्ट केले होते.

Web Title: taapsee pannu donates platelets to elderly woman tillotama shome praises her on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.