Taapsee pannu and bhumi pednekar starre saand ki aankh teaser out | Saand Ki Aankh Teaser: तापसी आणि भूमीच्या 'सांड की आँख'चा दमदार टीझर आऊट, ट्रेलर पाहून तुम्हाला वाटेल कौतूक
Saand Ki Aankh Teaser: तापसी आणि भूमीच्या 'सांड की आँख'चा दमदार टीझर आऊट, ट्रेलर पाहून तुम्हाला वाटेल कौतूक

तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर यांच्या सांड की आँख सिनेमाचा बहुप्रतीक्षित टीझर आऊट झाला आहे. टीझरची सुरुवात तापसी आणि भूमीच्या दमदार एन्ट्रीने होते. टीझर खूपच भन्नाट आहे. 1 मिनिटं 23 सेकंदाच्या या टीझरमध्ये तापसी आणि भूमी सांड की आँखवर निशाना लावताना दिसतायेत. तापसी आणि भूमी पहिल्यांदा वृद्ध महिलांच्या भूमिका रुपेरी पडद्यावर साकारणार आहेत. दोघी नेहमीच सोशल मीडियावर सेटवरचे फोटो शेअर करत असतात. टीझर बघून अंदाज लागतोच आहे की दिवाळीत फक्त फटाके नाही तर बॉक्स ऑफिसवर हा आपलं नाणं खणखणीत वाजवेल.  

 
 सांड की आँख' जगातील वयस्कर शार्पशूटर असलेल्या चंद्रो तोमर आणि प्रकाशी तोमर या महिलांच्या आयुष्यावर आधारित आहे. या दोघींची भूमिका तापसी आणि भूमी साकारणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन आणि कथा तुषार हिरानंदानी यांची असणार असून अनुराग कश्यप आणि निधी परमार याची निर्मिती करणार आहेत. 


या चित्रपटाची निर्मिती निधी परमार व अनुराग कश्यप करत आहेत. तर दिग्दर्शन तुषार हिरानंदानी करत आहेत. तापसी व भूमी या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत. त्यामुळे एका वेगळ्या भूमिकेत त्यांना रुपेरी पडद्यावर पाहणे कमालीचे ठरणार आहे.  तापसी व भूमी या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत. त्यामुळे एका वेगळ्या भूमिकेत त्यांना रुपेरी पडद्यावर पाहणे कमालीचे ठरणार आहे.

English summary :
Tashee Pannu and Bhumi Pedekarakar starer movie saand ki aankh movie's the most anticipated teaser out. The teasar starts with the hot and intense entry of Tashee Pannu and Bhumi Pedekarakar. It's almost 1 min 23 sec. teaser.


Web Title: Taapsee pannu and bhumi pednekar starre saand ki aankh teaser out
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.