taapsee pannu amitabh bachchan starrer film badla trailer | Badla trailer: अमिताभ बच्चन- तापसी पन्नूचा ‘बदला’; पाहा ट्रेलर!!
Badla trailer: अमिताभ बच्चन- तापसी पन्नूचा ‘बदला’; पाहा ट्रेलर!!

ठळक मुद्दे‘बदला’च्या ट्रेलरमधील एका सीनमध्ये अमृता सिंग हिचीही झलक पाहायला मिळतेय. ‘तुम्हारी सुलू’ फेम मानव कौल हाही एका फ्रेममध्ये दिसतोय.

तापसी पन्नू आणि अमिताभ बच्चन स्टारर सुजॉय घोष दिग्दर्शित ‘बदला’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय. ट्रेलर बघून चित्रपटाच्या कथेबद्दल अंदाज घेण्याचा तुमचा विचार असेल तर, तूर्तास तरी ते शक्य नाही. शेवटी हा सुजॉय घोषचा चित्रपट आहे आणि म्हणूनचं ट्रेलरमधून चित्रपटाच्या कथेचा अंदाज घेणे अशक्य आहे. सुजॉय यांनी यापूर्वी ‘कहानी’, ‘कहानी 2’ सारखे शानदार चित्रपट दिले आहे.
ट्रेलरमध्ये तापसी पन्नू एका उद्योगपतीच्या पत्नीची भूमिका साकारताना दिसतेय. तर अमिताभ बच्चन वकीलाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटात शाहरुख खान हाही एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. शाहरूखच्याच रेड चिलीज एंटरटेनमेंटने हा चित्रपट प्रोड्यूस केला आहे.


चित्रपटात अमिताभ बादल गुप्ता नामक पात्र साकारताना दिसणार आहेत. बादल गुप्ता ४० वर्षांत एकही केस हरलेला नाही. पण एक केस त्याला आव्हान देते. ही केस तापसी पन्नू लढताना दिसतेय. एकंदर काय तर या चित्रपटाच्या निमित्ताने एक जबरदस्त कोर्टरूम ड्रामा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यापूर्वी तापसी व अमिताभ यांच्या ‘पिंक’मधील कोर्टरूम ड्रामा प्रेक्षकांनी पाहिलाय.
‘बदला’च्या ट्रेलरमधील एका सीनमध्ये अमृता सिंग हिचीही झलक पाहायला मिळतेय. ‘तुम्हारी सुलू’ फेम मानव कौल हाही एका फ्रेममध्ये दिसतोय. चित्रपटाचा ट्रेलर दमदार आहे. तेव्हा पाहा आणि कसा वाटला हे नक्की कळवा.

English summary :
Tapasi Pannu and Amitabh Bachchan starer badla movie trailer released. The movie directed by Sujoy Ghosh. It is impossible to predict the story of the movie from the trailer. Sujoy has previously given a beautiful film like 'Kahaani' and 'Kahaani 2'. Tapasi Pannu seems to be playing the role of a businessman's wife. Amitabh Bachchan plays the lawyer. Shahrukh's Red Chillies Entertainment has produced this film.


Web Title: taapsee pannu amitabh bachchan starrer film badla trailer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.