एखादा इव्हेंट, सोहळ्याला हजेरी लावताना सेलिब्रिटी मंडळी संपूर्ण तयारीत हजेरी लावतात. या प्रसंगी आपण ग्लॅमरस, हँडसम कसे दिसू आणि उपस्थितांच्या नजरांसह कॅमे-याच्या नजरा आपल्याकडे कशा राहतील याची सेलिब्रिटी मंडळी विशेष काळजी घेतात. त्यामुळे महागडे डिझायनर ड्रेसेस किंवा स्टायलिश लूकमध्ये सेलिब्रिटी या कार्यक्रमांना हजेरी लावतात. मात्र कधी कधी याच स्टाईल आणि फॅशनमुळे सेलिब्रिटींवर कधी कधी अवघडल्यासारखी परिस्थिती येते. असंच काहीसं घडलं आहे अभिनेत्री स्वरा भास्करबरोबर. यावेळी इतरांप्रमाणे तिनेही हटके स्टाइल करत ग्रीन कार्पेटवर आपल्या खास अंदाजात एंट्री घेतली होती. 

मात्र ग्रीन कार्पेटवर येताच तिचे चेह-यावरचे हावभाव पाहून ती काहीशी वैतागलेली दिसत होती. अचानक वैतागलेल्या स्वराला पाहून नेमक काय झाले असा प्रश्न सा-यांनाच पडला होता. तिने घातलेले हाय हील्स सँडलमुळे स्वराला नीट चालायलाही जमत नव्हते. जेव्हा तिला ती हाय हील्स डोकेदुखी ठरली तेव्हाच तिने ती सँडल काढून फेकली. आणि हेच ते क्षणे मीडियाच्या कॅमे-यात कैद झाले. तसेच कोणत्याही सोहळ्यात फॅशन करताना सेलिब्रेटीमंडळी ट्रायल घेतात. मात्र अनेकदा ट्रायल घेऊनदेखील  काही ना काही कमतरता राहून जाते असाच काहीसे यावेळी स्वराबरोबरही घडले. 

नुकतेच स्वरा भास्कर लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेली होती.तिथेही बाप्पाच्या दर्शनानंतर अनवाणी पायाने घरी परतत असल्याचा व्हिडीओ स्वराने तिच्या इन्स्टास्टोरीवर शेअर केला आहे. ‘ही आहे खरी भक्ती...अनवाणी पायाने देवाच्या दर्शनाला पोहोचली. तुमच्या चपला हरवणार नसतील तर ते दर्शनच काय?’ असे तिने हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले.  

स्वराच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास सध्या ती फराज अन्सारीच्या ‘शीर खुरमा’ या चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटात तिच्यासोबत शबाना आझमी, दिव्या दत्ता महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.

Web Title: Swara Bhaskars Pic goes viral while showing off sandal at IIFA Awards 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.