​स्वरा भास्कर सांगतेय एक दिग्दर्शक दारूच्या नशेत तिच्या खोलीत आला होता आणि...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2017 09:58 AM2017-11-07T09:58:00+5:302017-11-07T15:28:00+5:30

स्वरा भास्करने गेल्या काहीच वर्षांत बॉलिवूडमध्ये तिचे एक वेगळे प्रस्थ निर्माण केले आहे. सुरुवातीच्या काळात स्वरा आपल्याला साहाय्यक अभिनेत्रीच्या ...

Swara Bhaskar contexts a director drunken liquor came to her room and ... | ​स्वरा भास्कर सांगतेय एक दिग्दर्शक दारूच्या नशेत तिच्या खोलीत आला होता आणि...

​स्वरा भास्कर सांगतेय एक दिग्दर्शक दारूच्या नशेत तिच्या खोलीत आला होता आणि...

googlenewsNext
वरा भास्करने गेल्या काहीच वर्षांत बॉलिवूडमध्ये तिचे एक वेगळे प्रस्थ निर्माण केले आहे. सुरुवातीच्या काळात स्वरा आपल्याला साहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली होती. नंतर तिने एक अभिनेत्री म्हणून तिची एक ओळख निर्माण केली. स्वराने तन्नू वेड्स मनू, तन्नू वेड्स मनू२, प्रेम रतन धन पायो, निल बट्टे सन्नाटे यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकरल्या आहेत. सध्या बॉलिवूडमध्ये होत असलेल्या लैंगिक शोषणाविषयी सगळ्या अभिनेत्री मोकळेपणाने बोलत आहेत. याविषयी स्वराने तिच्या आयुष्यातील एक किस्सा सांगितला आहे.
स्वरा भास्करला एका चित्रपटाचे चित्रीकरण करत असताना एक खूप वाईट अनुभव आला होता. या चित्रपटाचा दिग्दर्शक तिच्याशी अंगलट करण्याचा प्रयत्न करत होता. याविषयी स्वरा सांगते, मी चित्रपट सृष्टीत नवीन आल्यानंतर माझ्यासोबत देखील एक प्रकार घडला होता. एका चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी आलेल्या अनुभवाचा विचार केला तर आजही मला प्रचंड त्रास होतो. मी एका चित्रपटाचे चित्रीकरण करत असताना त्या चित्रपटाचा दिग्दर्शक सतत माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. तो माझ्या चित्रपटाचा दिग्दर्शक असल्याने आणि कामाचे ठिकाण असल्याने मला त्याच्याशी बोलायला खरे तर काहीच प्रोब्लेम नव्हता. पण तो बोलत असताना प्रेम आणि सेक्स या शब्दांचा सतत वापर करायचा. कोणातही दुसरा विषय सुरू असला तरी तो फिरून तिथेच यायचा. त्याच्या या वागणुकीला मी कंटाळले असल्याने मी त्याला टाळण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. पण काही केल्या तो माझा पिच्छा सोडत नव्हता. एकदा तर त्याने मला चक्क जेवण्यासाठी बाहेर जाण्याची ऑफर दिली होती. मी त्या दिवशी त्याला टाळले आणि तिथे जाण्यास नकार दिला. पण सेटवर सतत तो माझ्या मागे मागेच फिरायचा. एकदा तर तो दारुच्या नशेत माझ्या खोलीत आला होता आणि त्याला अलिंगन करण्यासाठी मला वारंवार सांगत होता. मी प्रचंड घाबरले होते. त्या दिवसानंतर मी खोलीत आल्यावर सगळे दिवे बंद करून बसत असे. दिवे बंद असल्याने मी झोपली असे वाटून खोलीत कोणी येणार नाही असे मला वाटत होते. शेवटी ही गोष्टी चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्यांच्या कानावर घातली. त्यामुळे त्याने माझ्यासोबत एक एस्कोर्ट दिला आणि त्यामुळेच त्या दिग्दर्शकासोबत पुढचे चित्रीकरण करणे मला खूपच सोपे गेले. 

Also Read : नितू चंद्राने केले स्वरा भास्करला रिप्लेस

Web Title: Swara Bhaskar contexts a director drunken liquor came to her room and ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.