हृतिक रोशनची एक्स-वाईफ सुजैन खानच्या घरी आला नवा पाहुणा, नाव ठेवले पर्पल खान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 05:15 PM2021-01-31T17:15:36+5:302021-01-31T17:16:29+5:30

सोशल मीडियावर शेअर केला फोटो

sussanne khan welcomes new puppy in her home names her purple khan | हृतिक रोशनची एक्स-वाईफ सुजैन खानच्या घरी आला नवा पाहुणा, नाव ठेवले पर्पल खान

हृतिक रोशनची एक्स-वाईफ सुजैन खानच्या घरी आला नवा पाहुणा, नाव ठेवले पर्पल खान

googlenewsNext
ठळक मुद्देहृतिक व सुजैन दोघांनी लग्नाच्या 14 वषार्नंतर 2014 साली घटस्फोट घेतला होता.

हृतिक रोशनची एक्स-वाईफ सुजैन खान हिच्या घरी एक नवा सदस्य आला आहे. कोण तर एक छोटासा पपी. होय, सुजैनने या पपीसोबतचा एक सुंदर फोटो सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोत सुजैनवा मुलगा रिदानही दिसतोय.

या पपीचे नामकरणही झाले आहे. सुजैन व तिच्या मुलांनी या पपीला ‘पर्पल खान’ असे नाव दिले आहे. ‘हॅलो ब्युटिफुल पर्पल... आमच्या कुटुंबात तुझे स्वागत. जाय व माल्जोची लिटिल प्रिन्सेस...पर्पल खान,’ या कॅप्शनसह पर्पल खानचा फोटो तिने शेअर केला आहे.

हृतिकने केले कौतुक

 सुजैन पेशाने इंटिरिअर डिझाईनर आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांचे घर तिने सजवले आहे. अलीकडे सुजैनने तिच्या कामाचा व्हिडीओ शेअर केला आणि हा व्हिडीओ पाहून हृतिक भारावला. त्याने लगेच या व्हिडीओवर कमेंट केली. अमेजिंग, असे त्याने लिहिले.
घटस्फोटानंतरही हृतिक व सुजैनच्या नात्यात कुठल्याही प्रकारची कटुता आलेली नाही.मुलांचा वाढदिवस असो किंवा घरातल्या पार्ट्या असो, डिनर डेट, न्यू ईयर पिकनीक  सगळीकडेच हृतिक व सुजैन एकमेकांसोबत दिसतात. घटस्फोट झालेल्या या कपल इतक्यांदा एकत्र पाहून अनेकांना आश्चर्य वाटते. पण  यामागे एक खास कारण आहे.

होय, एका मुलाखतीत हृतिकने स्वत: यामागचे कारण सांगितले होते. या मुलातखती हृतिक सुजैनबद्दल भरभरून बोलला होता. ‘आमचा घटस्फोट झालाय, त्यामुळेच तू तुझ्या एक्स- वाईफसोबत इतक्या सहजपणे कसा राहू शकतोस? असा प्रश्न मला अनेकजण विचारतात. खरे सांगायचे तर आमच्या दोन्ही मुलांसाठी आम्ही हे करतो.  आजही आम्ही  एकमेकांचा प्रचंड आदर करतो.  आपल्या मॉम-डॅडमध्ये मतभेद आहेत. पण प्रॉब्लेम नाहीत, हे माझ्या मुलांना कळावे. आपल्या आईला प्रेम आणि आदर मिळतो, हे त्यांना कळावे, हा माझा प्रयत्न असतो. विभक्त झालो असलो तरी कुटुंब म्हणून आपण सोबत आहोत, हे मुलांच्या मनावर बिंबवण्याचा आमचा प्रयत्न असतो, असे हृतिकने या मुलाखतीत सांगितले होते.

Web Title: sussanne khan welcomes new puppy in her home names her purple khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.