VIDEO: सुझान खानने दाखवला तिच्या आलिशान घराचा काना-कोपरा, हृतिक रोशन म्हणाला....

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2020 12:42 PM2020-09-28T12:42:40+5:302020-09-28T12:43:41+5:30

१८ मिनिटांच्या या व्हिडीओत सुझान खानने फॅन्सना तिच्या घराचा कानाकोपरा दाखवला. या व्हिडीओवरून सुझान खानच्या लाइफस्टाईलची झलक बघायला मिळते.

Sussanne Khan share a video of her luxurious Mumbai home so here what Hrithik Roshan commented | VIDEO: सुझान खानने दाखवला तिच्या आलिशान घराचा काना-कोपरा, हृतिक रोशन म्हणाला....

VIDEO: सुझान खानने दाखवला तिच्या आलिशान घराचा काना-कोपरा, हृतिक रोशन म्हणाला....

googlenewsNext

इंटेरिअर डिझायनर आणि हृतिक रोशनची एक्स वाइफ सुझान खानने तिच्या मुंबईतील आलिशान घराचा एक व्हिडीओ शेअर केलाय. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या १८ मिनिटांच्या या व्हिडीओत सुझान खानने फॅन्सना तिच्या घराचा कानाकोपरा दाखवला. या व्हिडीओवरून सुझान खानच्या लाइफस्टाईलची झलक बघायला मिळते.

जुहू येथील एका बिल्डींगमधील १५व्या मजल्यावर सुझान खानने दोन अपार्टमेंट एकत्र करून हे घर तयार केलंय. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, लिव्हिंग रूममध्ये किती मोठा स्पेस आहे.  त्यासोबतच बाल्कनीतून समुद्राचा खास नजाराही दिसतो.

आर्किटेक्चरच्या डायजेस्टकडून शूट करण्यात आलेल्या या व्हिडीओत सुझान खानने फॅन्सना तिचं ऑफिस आणि किचनही दाखवलं. त्यासोबतच घराला डेकोरेट करण्यासाठी तिने अनेक खास वस्तूही वापरल्या आहेत. 

सुझान खानच्या या व्हिडीओवर मलायका अरोरा ते बिपाशा बसु आणि हृतिक रोशनने सुद्धा रिअ‍ॅक्शन दिली आहे. सुझानचा एक्स हसबंड हृतिकने लिहिले की, अमेझिंग आणि किचन १००. तर मलायकाने लिहिले की, तुझं घर शानदार आहे. बिपाशाने लिहिले की, लव्ह इट. तर सुझानच्या एका फॅनने लिहिले की, खूप शानदार घरटं आहे. 

दरम्यान, सुझान खान आणि हृतिक रोशनने २००० साली लग्न केलं होतं. पण नंतर २०१४ मध्ये घटस्फोट घेऊन वेगळे झाले होते. त्यांना रेहान आणि ऋदान नावाची दोन मुले आहेत.

Web Title: Sussanne Khan share a video of her luxurious Mumbai home so here what Hrithik Roshan commented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.