Sushmita sen reacts on boyfriend rohman shawl as he gets her tattoo | सुश्मिता सेनच्या नावाचा बॉयफ्रेंड रोहमन शॉलने काढला टॅटू, अभिनेत्रीची रिअ‍ॅक्शन झाली व्हायरल

सुश्मिता सेनच्या नावाचा बॉयफ्रेंड रोहमन शॉलने काढला टॅटू, अभिनेत्रीची रिअ‍ॅक्शन झाली व्हायरल

सुश्मिता सेन आणि रोहमन शॉल हे बॉलिवूडमध्ये लोकप्रिय कपलपैकी एक आहेत. दोघेही अनेकदा एकमेकांवर प्रेम करतात आणि यूजर्स लक्ष वेधून घेते असतात. आता रोहमनने त्याच्या लेडी लव्ह सुश्मितासाठी एक टॅटू बनवला आहे. रोहमनने टॅटूचा फोटो  सोशल मीडियावर शेअर केला आहे. सुश्मिता सेनने रोहमनच्या पोस्टवर रिअ‍ॅक्शन दिली आहे.

रोहमनने टॅटूचा फोटो शेअर करत लिहिले, 'इंक कायमस्वरूपी नाही पण प्रेम आहे.' रोहमने या पोस्टला सुश्मिता सेनला सुद्धा टॅग केला आहे. अभिनेत्रीनेसुद्धा रोहमनचे इन्स्टास्टोरीवर आपलं रिअ‍ॅक्शन दिलं आहे. सुष्मिता सेनने इन्स्टास्टोरीवर शेअर करते लिहिले, #rohmance.   

सुश्मिता  आणि  रोहमन एकमेकांना दीर्घकाळापासून डेट करतायेत. रोहमन आणि सुष्मिता सेनची लव्हस्टोरी फॅशन शो दरम्यान सुरू झाली होती. पण सुष्मिताने एका मुलाखती दरम्यान सांगितले की, त्यांची लव्हस्टोरी एका टच स्क्रीन फोनमुळे सुरू झाली होती. सुष्मिताने सांगितले होते की, रोहमनने तिला इन्स्टाग्रामवर डीएम केलं होतं. सुष्मिता तेव्हा मेसेज चेक करत नव्हती. कारण तिला असं वाटत होतं की, असं केल्याने लोकांना तिच्यासोबत इंटरॅक्टची परमिशन मिळेल. सुश्मिता सेनची मोठी मुलगी रिनी सेन लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sushmita sen reacts on boyfriend rohman shawl as he gets her tattoo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.