वयाच्या 43 व्या वर्षी सुश्मिता शिकतेय ही गोष्ट, वाचून तुम्हीही व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2019 04:27 PM2019-09-03T16:27:30+5:302019-09-03T16:27:37+5:30

बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन आणि मॉडेल रोहमन शॉल अफेअरच्या चर्चेमुळे सतत चर्चेत असते. सोशल मीडियावर ती रोहन सोबतचे फोटो शेअर करत असते.

Sushmita sen is learning scuba diving at the age of 43 | वयाच्या 43 व्या वर्षी सुश्मिता शिकतेय ही गोष्ट, वाचून तुम्हीही व्हाल थक्क

वयाच्या 43 व्या वर्षी सुश्मिता शिकतेय ही गोष्ट, वाचून तुम्हीही व्हाल थक्क

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन आणि मॉडेल रोहमन शॉल अफेअरच्या चर्चेमुळे सतत चर्चेत असते. सोशल मीडियावर ती रोहन सोबतचे फोटो शेअर करत असते. यावेळी सुश्मिताने सोशल मीडियावर एक नवा व्हिडीओ शेअर केला आहे.  या व्हिडीओत सुश्मिता स्कूबा डायव्हिंग एडवेंचर करताना दिसतेय. या व्हिडीओ शेअर  करताना लिहिले आहे की, 43 व्या वर्षी स्किन डायव्ह शिकतेय. आयुष्यात कोणत्याच गोष्टीसाठी कधी उशीर होत नसतो.   


सुश्मिताची लहान मुलगी अलीशा गेल्या 28 ऑगस्टला 10 वर्षांची झाली. सुशने एक भावूक पोस्ट लिहून अलीशाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. सुश्मिताचा बॉयफ्रेन्ड रोमहन शॉलही मागे नव्हता. त्यानेही अलीशाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एक परफेक्ट फॅमिली फोटो शेअर केला. ‘माझी प्रिय अलीशा, वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. गबडू, शेवटी तू दोन अंकांच्या वयात आलीच. माझी समजुदार लेक, देवाने दिलेली एक अनमोल भेट. टिन्गा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. नेहमी चमकत राहा,’ असे रोहमनने लिहिले.


यावर्षी अखेरिस म्हणजे डिसेंबर महिन्यात हे कपल लग्न करू शकते, अशी सध्या चर्चा आहे. चर्चा खरी मानाल तर, रोहमनने कधीच सुश्मिताला लग्नासाठी प्रपोज केले आहे आणि सुशनेही त्याचा लग्नाचा प्रस्ताव मान्य केला आहे.

काही महिन्याआधी सुश्मिता आणि रोहमनने सोशल मीडियावर त्यांच्या नात्याची कबुली केली होती. सुश्मिता सेन बराच काळ सिनेमाच्या पडद्यापासून लांब आहे. २०१० साली प्रदर्शित झालेल्या ‘नो प्रॉब्लम’ नंतर ती सिनेमात दिसलीच नाही. मात्र, रोहमनशी असलेल्या मैत्रीमुळे ती सतत चर्चेत असते.  

Web Title: Sushmita sen is learning scuba diving at the age of 43

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.