Sushant Singh Rajput's new girlfriends come to life? | सुशांत सिंग राजपूतच्या आयुष्यात आली नवी गर्लफ्रेंड ?
सुशांत सिंग राजपूतच्या आयुष्यात आली नवी गर्लफ्रेंड ?
अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा एका पार्टीतला फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. या फोटोमुळे सध्या सुशांत सिंग चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. 
या फोटोमध्ये सुशांत सिंगसोबत एक मुलगी दिसते आहे. य हि मुलगी आलिया भट्ट खास मैत्रिण आकांक्षा रंजन कपूर आहे. जी सुशांत सिंगच्या मिठीत दिसते आहे.आकांक्षाने स्वत: तिच्या हा सुशांत सिंगसोबतचा फोटो इन्स्टाग्राम शेअर केला आहे.  या फोटोला आकांशाने एक कॅप्शन देखील दिले आहे. ‘पहिला दिवस क्रमश:,’ असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. आकांक्षाची बहिण अनुष्काने बॉलिवूडमध्ये वेडिंग पुलाव चित्रपटातून पदार्पण केले आहे. 

गेल्या काही महिन्यांपासून सुशांतसिंग राजपूत आणि क्रिती सॅनन या दोघांचे रिलेशनशिप  कुणापासूनही लपून राहिलेले नव्हते. त्यामुळे सुशांतच्या या फोटोमुळे क्रिती आणि त्याच्यात सगळे अलबेल तर आहेना अशी चर्चा सुरु झाली आहे. कोणत्याही इव्हेंटला क्रिती सॅननसोबत दिसणार सुशांत अचानक आकांक्षाच्या मिठीत कसा दिसला असा प्रश्न अनेकांना पडला आहे. बी-टाऊनमध्ये सुशांत व क्रितीच्या नात्याची चर्चा बरीच पुढे गेली आहे. अगदी लग्नापर्यंत पुढे. सुशांत व क्रिती दोघेही एकमेकांबद्दल सीरिअस असून दोघांनीही एकमेकांना आपआपल्या पालकांना भेटवले आहे. याच्या पुढची खबर म्हणजे, दोघांनीही लग्न करण्याचा निर्णयही घेतला आहे. अर्थात हे लग्न इतक्यात होणारे नाही. पण लग्नासाठी हे कपल रेडी असल्याचे कळतेय. एकमेकांसोबत आयुष्य घालवण्याच्या निर्णयाप्रत हे दोघेही पोहोचल्याचे समजतेय. 

नुकतेच सुशांतने त्याचा चित्रपट ब्रदीनाथचे पहिल्या शेड्यूलचे शूटिंग पूर्ण केले आहे. सुशांत सिंग राजपूत पिठ्ठूची भूमिका साकारणार आहे. हा दोघांची लव्हस्टोरी या चित्रपटात बघायला मिळणार आहे. दोघांची केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच आतुर असतील यात काही शंका नाही. सारा एका श्रीमांत घरातील मुलगी असते आणि पिठ्ठू तिच्या प्रेमात पडतो. सारा आपल्या पहिल्या चित्रपटाताला घेऊन एक्साइटेड आहे. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 
Web Title: Sushant Singh Rajput's new girlfriends come to life?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.