सुशांतच्या ट्विटर प्रोफाईलवरच्या त्या चित्राने सर्वांना केले होते हैराण; वाचा, ‘त्या’ चित्राची थक्क करणारी कहाणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 01:17 PM2021-06-14T13:17:45+5:302021-06-14T13:18:17+5:30

Sushant Singh Rajput death anniversary: सुशांत सिंग राजपूतचे ट्विटरची कव्हर इमेज म्हणून एक पेटिंग ठेवले होते. Starry Night असे या पेटिंगचे नाव असून ते व्हिन्सेट व्हॅन गॉघ यांनी 1889 मध्ये चितारले होते.

sushant singh rajput twitter cover photo starry night real story will blow your mind | सुशांतच्या ट्विटर प्रोफाईलवरच्या त्या चित्राने सर्वांना केले होते हैराण; वाचा, ‘त्या’ चित्राची थक्क करणारी कहाणी 

सुशांतच्या ट्विटर प्रोफाईलवरच्या त्या चित्राने सर्वांना केले होते हैराण; वाचा, ‘त्या’ चित्राची थक्क करणारी कहाणी 

googlenewsNext
ठळक मुद्देसुशांतने अपार कष्ट करत लोकप्रियता मिळवली. पण त्याच्या मनात काय सुरू होते, याचा थांगपत्ता कुणालाच लागला नाही. आजही त्याच्या मृत्यूचे गूढ कायम आहे.

सुशांत सिंग राजपूतने (Sushant Singh Rajput ) 14 जून 2020 रोजी मुंबईतील आपल्या राहत्या घरी कथितरित्या गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याच्या निधनाचे वृत्त ऐकून सर्वांनाच धक्का बसला होता. (Sushant Singh Rajput death anniversary) आज सुशांतच्या निधनाच्या एक वर्षानंतरही त्याचे चाहते, त्याचे कुटुंबीय व मित्र या धक्क्यातून सावरलेले नाहीत. सुशांतने अनेक स्वप्नं पाहिली होती, त्याच्या डोळ्यांतील ती असंख्य स्वप्नं, त्याच्या चेह-यावरचं निरागस हास्य कधीही कुणीच विसरू शकणार नाही.
सुशांत चित्रपट अभिनेता होता. पण त्याच्यामनात ग्रह-ता-यांबद्दल अपार कुतूहल होते. तासन् तास तो आकाशातील ग्रह-ता-यांचे निरीक्षण करत बसायचा. सोबत काम करणा-या अनेकांना सुशांत या ग्रह-ता-यांबद्दल वेगवेगळी माहिती द्यायचा. त्याच्या सोशल मीडिया पोस्टवर नजर टाकल्यास सुशांतबद्दलच्या अनेक इंटरेस्टिंग गोष्टी दिसतील.

सुशांतच्या ट्विटर हँडलबद्दल सांगायचे तर त्याने एका पेंटिंगचा फोटो कव्हरपेजवर लावला होता. या पेंटिंगमागची कथा खूपच रोमांचक आहे. ही एक जगप्रसिद्ध पेंटिंग आहे. जगातील सर्वाधिक गाजलेल्या आर्ट पीसपैकी एक आहे. कॉफी मगपासून तर घरांच्या भींतींपर्यंत ही पेंटिंग तुम्हाला दिसेल. जगप्रसिद्ध चित्रकार व्हिन्सेंट व्हॅन गोघ (Vincent van Gogh - Starry Night) यांनी ते चितारले होते. या चित्राचे सौंदर्य अनंत आहे. कदाचित शब्दांत सांगता येणार नाही,असे. त्यामुळेच या चित्राचा अर्थ, त्याचा भावर्थ समजणे प्रत्येकाला शक्य नाही. कदाचित सुशांतसारखे दुस-या जगाची स्वप्नं बघणारी माणसंच या चित्राला उत्तमरित्या समजू शकतात.
 Starry Nights असे या पेटिंगचे नाव असून ते व्हिन्सेट व्हॅन गॉघ यांनी 1889 मध्ये चितारले होते. त्यावेळी गॉघ हे नैराश्यामुळे मनोरुग्णालयात होते. यानंतर 1890 साली व्हिन्सेट गॉघ यांनी आत्महत्या केली.


 
व्हिन्सेट गॉघ यांचे Starry Nights हे पेटिंग त्यांच्या मृत्यूनंतर प्रचंड लोकप्रिय झाले. गॉघ यांना वैयक्तिक आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आयुष्याच्या शेवटच्या वर्षात त्यांच्यावर मानसिक उपचार सुरु होते. याच काळात त्यांनी Starry Nights हे पेटिंग काढले होते. 27 जुलै 1890 रोजी हे पेटिंग जवळपास पूर्ण होत आले असताना गॉघ यांनी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 
 ज्या चित्रकाराने नैराश्यापोटी आत्महत्या केली होती, त्याचेच चित्र सुशांतने आपल्या ट्विटर हँडलवर ठेवले होते आणि तो सुद्धा नैराश्यात होता, हा एक दुर्दैवी योगायोग मानता येईल.
सुशांतने अपार कष्ट करत लोकप्रियता मिळवली. पण त्याच्या मनात काय सुरू होते, याचा थांगपत्ता कुणालाच लागला नाही. आजही त्याच्या मृत्यूचे गूढ कायम आहे.
 
 

Web Title: sushant singh rajput twitter cover photo starry night real story will blow your mind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.