"सुशांतची आत्महत्या नाही हत्या, बॉलिवूड माफियांनी घेतला त्याचा जीव" कंगना राणौतने लावले गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 10:14 AM2020-06-20T10:14:47+5:302020-06-20T10:14:54+5:30

कंगनाने एक नवा व्हिडीओ शेअर करत बॉलिवूड इंडस्ट्रीवर आगपाखड केली आहे.

Sushant singh rajput suicide kangana ranaut angry on movie mafia | "सुशांतची आत्महत्या नाही हत्या, बॉलिवूड माफियांनी घेतला त्याचा जीव" कंगना राणौतने लावले गंभीर आरोप

"सुशांतची आत्महत्या नाही हत्या, बॉलिवूड माफियांनी घेतला त्याचा जीव" कंगना राणौतने लावले गंभीर आरोप

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर कंगना राणौत सतत बॉलिवूडमध्ये असलेल्या नेपोटिझम विरोधात आवाज उचलते आहे. पुन्हा एकदा कंगनाने एक नवा व्हिडीओ शेअर करत बॉलिवूड इंडस्ट्रीवर आगपाखड केली आहे. या व्हिडीओत कंगना म्हणते, काही मीडिया समुहांनी सुशांत विरोधात खोट्या बातम्या पसरवल्या आणि त्याला त्रास दिला. त्यांनी प्लान बनवून सुशांतला मेंटली टॉर्चर केले. यासोबतच ती म्हणते, नेपो(स्टार)किड्सबाबत कधीच का लिहिले जात नाही? असा प्रश्न कंगनाने   उपस्थित केला आहे. 

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येला कंगना हत्या म्हणतेय. पुढे ती म्हणते, सुशांतच्या हत्येनंतर बर्‍याच गोष्टी समोर आल्या आहेत. काही गोष्टी मी वाचल्या तर काही लोकांशी मी संवाद साधला. त्याच्या वडील म्हणणे आहे की, चित्रपटसृष्टीतील तणावामुळे तो त्रस्त होता. दिग्दर्शक अभिषेक कपूरचे म्हणणे आहे की, त्याला पद्धतशीरपणे तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याच्या एक्स गर्लफ्रेंडच्या म्हणण्यानुसार, सर्वाजनिक त्याचा झालेला अपमान तो सहन करु शकला नाही. या चित्रपट माफियांनी केवळ त्याला बॅन नव्हते केले तर हळूहळू त्याच्या मेंदूचीदेखील तोडफोड केली.''

यानंतर कंगनाने सुशांतबाबत छापून आलेल्या अनेक बातम्या वाचलून दाखलल्या आहेत. कंगना म्हणते,'' एका वेबसाइटने लिहिले की, सुशांत एका ट्रक ड्रायव्हरसारखे वाटतो. दुसऱ्या बातमी लिहिण्यात आले की, त्याने एका पार्टीत तमाशा करुन एका दिग्दर्शकाच्या डोक्यात काचेची बाटली फोडली. कंगना पुढे म्हणते, एक वेबसाईटने असे लिहिले होते की, सुशांत मीटू मुळे जेलमध्ये जाऊ शकतो. सुशांत सिंग राजपूत विरोधात अशा अनेक खोट्या बातम्या लिहिण्यात आल्या.''

Web Title: Sushant singh rajput suicide kangana ranaut angry on movie mafia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.