‘पानी’वरून झाले होते मतभेद; म्हणून सुशांतने मोडला होता यशराजसोबतचा करार, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 01:16 PM2020-06-28T13:16:05+5:302020-06-28T13:17:06+5:30

पोलिस चौकशीत शानू शर्माने केले काही महत्त्वपूर्ण खुलासे

sushant singh rajput suicide case police investigate to yashraj films casting director shanoo sharma | ‘पानी’वरून झाले होते मतभेद; म्हणून सुशांतने मोडला होता यशराजसोबतचा करार, वाचा सविस्तर

‘पानी’वरून झाले होते मतभेद; म्हणून सुशांतने मोडला होता यशराजसोबतचा करार, वाचा सविस्तर

googlenewsNext
ठळक मुद्दे  झलक दिखला जा रियालिटी शो दरम्यान मी त्याला यशराज साठी कास्ट केले होते, असेही शानूने पोलिसांना सांगितले.

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी वांद्रे पोलिसांनी आत्तापर्यंत 27 लोकांची चौकशी केली आहे. यात यशराज फिल्म्सची कास्टिंग डायरेक्टर शानू शर्माचाही समावेश आहे. पोलिस चौकशीत शानू शर्माने काही महत्त्वपूर्ण खुलासे केले आहेत. आदित्य चोप्रा आणि ‘पानी’चा दिग्दर्शक शेखर कपूर यांच्यात आलेल्या काही मतभेदांमुळे ‘पानी’ चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही. यामुळे यशराज फिल्म्सवर सुशांत नाराज होता, असा खुलासा शानू शर्माने आपल्या जबाबत  केला आहे.

शानू शर्माने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार,  यशराजसोबत ‘पानी’ हा तिसरा चित्रपट करण्यास सुशांत खूप उत्सुक होता. यशराज यांनाही हा चित्रपट बिग बजेट चित्रपट बनवायचा होता. यशराजने या चित्रपटाच्या पूर्वनिर्मितीसाठी 4-5 कोटी रुपये खर्चही केले होते़ परंतु आदित्य चोप्रा आणि दिग्दर्शक शेखर कपूर यांच्यात हा चित्रपट करण्यासाठी एकमत झाले नाही. या दोघांमध्ये चित्रपट विषय क्रीएटिव डिफरन्समुळे हा चित्रपट बनू शकला नाही. हा चित्रपट पूर्ण न झाल्यामुळे सुशांत नाराज होता आणि त्याने यशराज फिल्म्स सोडण्याचा निर्णय घेतला होता.
 करार मोडल्यानंतरही सुशांतला यशराजने जाण्याची परवानगी का दिली, असा सवाल पोलिसांनी शानू शर्माला केला असता तिने सांगितले की, ‘सुशांतने आम्हाला यशराज सोडण्याची विनंती केली होती. यशराजला देखील हा विषय जास्त ताणून धरायची इच्छा नव्हती.  हा करार प्रत्येकाच्या संमतीने संपत होता, म्हणून यशराजांनी सुशांतवर तिसरा चित्रपट करण्याचा आग्रह धरला नाही आणि तो करारातून बाहेर पडला.

 सुशांतने रियालाही यशराज चित्रपटही सोडण्यास सांगितले होते, हे खरे आहे का? असा प्रश्न पोलिसांनी केल्यावर शानूने सांगितले की, ‘सुशांत यशराजशी नाराज नव्हता. सुशांत स्वत:च्या मर्जीने यशराजच्या कानट्रॅक्ट मधून बाहेर पडला. यशराज आणि सुशांतमध्ये कोणते ही मतभेद, भांडण किंवा आर्थिक संबंधही राहिले नव्हते.
  यशराजबरोबर झालेल्या करारामुळे सुशांतला मोठा चित्रपट सोडावा लागला होता का? यावर  आपल्याकडे याबद्दल काही माहिती नाही,असे शानूने सांगितले.

 पवित्र रिश्ता  आणि झलक दिखला जा  नंतर सुशांत छोट्या पडद्यावर खूप लोकप्रिय झाला.  झलक दिखला जा रियालिटी शो दरम्यान मी त्याला यशराज साठी कास्ट केले होते, असेही शानूने पोलिसांना सांगितले.
 यशराज सुशांतला औरंगाजेब चित्रपटासाठी कास्ट करणार होते. या चित्रपटात सुशांतला अर्जुन कपूरच्या भावाच्या भूमिकेची आॅफर देण्यात आली होती. पण यशराजने त्या चित्रपटासाठी सुशांतला पाठविलेले मेल त्याने पाहिला नाही. जेव्हा सुशांत यशराजकडे परत आला, तेव्हा तो ‘काय पो चे’ चित्रपट करत होता, म्हणूनच यशराज यांनी नंतर सुशांतला ‘शुद्ध देसी रोमान्स’ या चित्रपटासाठी साइन केले. सुशांतने यशराजसाठी केलेला दुसरा चित्रपट ‘ब्योमकेश बक्षी’ होता, असेही शानूने सांगितले.


 

Web Title: sushant singh rajput suicide case police investigate to yashraj films casting director shanoo sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.