सुशांत सिंग राजपूत हत्या की आत्महत्या? प्रकरणात आला नवीन ट्विस्ट

By तेजल गावडे | Published: October 3, 2020 01:15 PM2020-10-03T13:15:43+5:302020-10-03T13:18:15+5:30

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात नवीन ट्विस्ट आला आहे.

Sushant Singh Rajput murder suicide? There was a new twist in the case | सुशांत सिंग राजपूत हत्या की आत्महत्या? प्रकरणात आला नवीन ट्विस्ट

सुशांत सिंग राजपूत हत्या की आत्महत्या? प्रकरणात आला नवीन ट्विस्ट

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाला जवळपास तीन महिने उलटले असून या प्रकरणी दर दिवशी नवीन खुलासे समोर येत आहे. १४ जून, २०२० रोजी सुशांतने वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. पण ही आत्महत्या आहे की हत्या, हे स्पष्ट झालेले नाही. आता या प्रकरणात नवीन ट्विस्ट आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार दिल्ली स्थित अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (All India Institute Of Medical Sciences, New Delhi)च्या डॉक्टरांच्या एका पॅनेलने सीबीआयला आपले मत देत सांगितले की अभिनेता सुशांत सिंग राजपूतची हत्या नाही झाली तर हे आत्महत्येचे प्रकरण आहे.


सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी साडे तीन महिन्यानंतर आलेल्या आत्महत्येच्या थेअरीला एम्स फॉरेंसिक टीमचा फायनल रिपोर्ट म्हटले जात आहे. हा रिपोर्ट एम्सच्या पॅनेलने सीबीआयकडे सुपूर्द केला आहे ज्याचा सीबीआय अभ्यास करत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एम्सच्या फॉरेंसिक पॅनेलने सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी त्यांच्याकडून तपास पूर्ण केला आहे. इतकेच नाही तर सीबीआयला आपली वैद्यकीय आणि कायदेशीर मत देऊन फाइल बंद केली आहे. त्यानंतर आता सीबीआय एम्सच्या रिपोर्टसोबत त्यांच्या तपास जुळवून या प्रकरणाचा निष्कर्ष काढण्यात जुंपली आहे.


दुसरीकडे सुशांत सिंग राजपूतचे कुटुंब सातत्याने सुशांतच्या आत्महत्येला हत्या सांगत आहेत. मात्र एम्सच्या फॉरेंसिक पॅनेलने सुशांतच्या कुटुंब आणि त्यांच्या वकिलांच्या मर्डर थेअरीला फेटाळून लावले आहे की त्याला विष दिले होते किंवा कुणीतरी त्याचा गळा दाबून त्याची हत्या केली.


सुशांत सिंग राजपूतने १४ जून रोजी मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. सुरूवातीला मुंबई पोलिसांनी आत्महत्येचे प्रकरण समजून तपास केला होता. तर सुशांतच्या कुटुंबाने काही दिवसांनंतर हत्या असल्याचे सांगत सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला हत्येसाठी जबाबदार ठरविले होते आणि तपासाची मागणी केली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. आता या प्रकरणात सीबीआय काय निष्कर्ष काढते, याकडे सगळ्यांचे लक्ष वेधून राहिले आहे.


 

Read in English

Web Title: Sushant Singh Rajput murder suicide? There was a new twist in the case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.