सुशांतने ९ जूनला बहीण मीतूला केला होता SOS कॉल, म्हणाला होता - हे लोक माझा जीव घेतील...

By अमित इंगोले | Published: September 22, 2020 10:42 AM2020-09-22T10:42:20+5:302020-09-22T10:43:06+5:30

सुशांत सिंह राजपूत केसमध्ये आता नवा खुलासा झाला आहे की, सुशांतने त्याची बहीण मीतूला ९ जूनला फोन करून त्याला वाटणाऱ्या भीतीबाबत सांगितले होते.

Sushant Singh Rajput made sos calls to his sister Meetu Singh on june 9 and said tha they will kill me | सुशांतने ९ जूनला बहीण मीतूला केला होता SOS कॉल, म्हणाला होता - हे लोक माझा जीव घेतील...

सुशांतने ९ जूनला बहीण मीतूला केला होता SOS कॉल, म्हणाला होता - हे लोक माझा जीव घेतील...

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत १४ जूनला मुंबईच्या बांद्र्यातील घरात मृत आढळून आला होता. सुशांतच्या केसचा तपास सीबीआय, ईडी आणि एनसीबीसारख्या एजन्सी करत आहेत. या केसमध्ये आता नवा खुलासा झाला आहे की, सुशांतने त्याची बहीण मीतूला ९ जूनला फोन करून त्याला वाटणाऱ्या भीतीबाबत सांगितले होते. तो बोललेल्या गोष्टींवरून वाटतं त्याचा जीव धोक्यात होता.

टाइम्स नाउच्या रिपोर्टनुसार, सुशांत सिंह राजपूतने मृत्यूच्या ५ दिवसआधी त्याची बहीण मीतू सिंहला ९ जून रोजी एसओएस कॉल केला होता. सुशांत त्याच्या बहिणीला म्हणाला की, 'हे लोक मला फसवू शकतात. मला भीती वाटत आहे. माझा जीव घेतील'. रिपोर्टमध्ये हेही सांगण्यात आलं आहे की, सुशांतने रिया चक्रवर्तीसोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला. ती त्याला ८ जून रोजी सोडून गेली होती आणि सुशांतचा नंबर ब्लॉक केला होता.

सुशांत सिंह राजपूतने त्याच्या बहिणीलासोबत कॉल दरम्यान केलेल्या गोष्टींमुळे प्रश्न उपस्थित होतो की, अखेर त्याला कोणत्या लोकांची भीती होती आणि त्याला कोणत्या गोष्टींमध्ये फसवलं जाण्याची भीती होती. इतकेच काय तर सुशांतने जीवाला धोका असल्याचा संशय का व्यक्त केला असावा?

दरम्यान, सीबीआयच्या सूत्रांनुसार, सुशांतने १३ जूनला दुपारपासूनच कोणत्याही कॉलला किंवा मेसेजला उत्तर देणं बंद केलं होतं. सुशांतची बहीण मीतूने सुद्धा ही बाब आधीच सांगितली होती. १४ जूनच्या सकाळी सुशांतने मीतूचा फोन उचलला नव्हता. तेच पोलिसांना चौकशीदरम्यान रियाने सांगितले होते की, सुशांत डिप्रेशनमध्ये होता आणि तो तिला म्हणाला होता की, त्याला एकटं सोडून जा. त्यामुळे ती त्याची स्थिती पाहून त्याला एकटं सोडून गेली. तिला वाटलं होतं की, काही दिवसात तो बरा होईल आणि त्याला काही दिवस विचार करण्यासाठी एकटं सोडलं पाहिजे.

सुशांतच्या मृत्युचं गूढ उकणार सीबीआय

दरम्यान, सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू आत्महत्या की हत्या याचा अद्याप खुलासा झालेला नाही. सीबीआयची टीम या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सातत्याने तपास करत आहे. दरम्यान, उद्या म्हणजेच मंगळवारी सीबीआय आणि एम्स टीम यांच्यात महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत दोन्ही टीम सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूशी संबंधित तपासणीच्या तपशीलांवर चर्चा करणार आहे.

अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूची चौकशी करणारे केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) मंगळवारी एम्सच्या मेडिकल बोर्ड (एम्स) बरोबर एक महत्त्वपूर्ण बैठक घेईल, अशी माहिती वृत्तसंस्था आयएएनएसने सोमवारी दिली. सूत्रांच्या माहितीनुसार, सीबीआय आणि सीएफएसएलच्या पथकांनी केलेल्या तपासणीच्या निष्कर्षांवर या बैठकीत चर्चा केली जाईल. विशेष म्हणजे सीबीआयच्या पथकाने मुंबईत राहून सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूची सातत्याने चौकशी केली आहे. सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) ची फॉरेन्सिक टीम दक्षिण दिल्लीतील लोधी रोड भागात मुख्यालयात सीबीआयच्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) टीम सदस्यांची भेट घेईल.

सूत्रांनी सांगितले की, सीबीआय आणि सीएफएसएलच्या एसआयटी अहवालाचा अभ्यास केल्यानंतर सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणात काही तथ्य लपलेले आहे की नाही याबाबत एम्स मेडिकल बोर्ड अंतिम निर्णय घेईल. सूत्रांनी सांगितले की, सीबीआय आपले तपास तपशील एम्सच्या फॉरेन्सिक टीमसमवेतही सांगेल आणि त्यानंतर पुढील कारवाईचा निर्णय घेणार असल्याची माहिती जागरणने दिली आहे.

हे पण वाचा :

बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन: दीपिका पादुकोणला NCB समन्स बजावणार

 'क्या तुम्हारे पास माल है?' उघड झाले नवे ड्रग चॅट, टॉप सेलिब्रेटींचा समावेश

सुशांत घाबरायचा, म्हणून मित्रांजवळ ड्रग्ज ठेवायचा...! रिया चक्रवर्तीचा NCB समोर मोठा खुलासा

Web Title: Sushant Singh Rajput made sos calls to his sister Meetu Singh on june 9 and said tha they will kill me

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.