आत्महत्येच्या एक दिवसआधी सुशांतने पेट्ससाठी पैसे केले होते ट्रान्सफर, केअरटेकरचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 10:37 AM2020-09-07T10:37:31+5:302020-09-07T10:40:30+5:30

आता सुशांतच्या लोणावळा येथील फार्म हाउसचा केअऱटेकर रईसने सुशांतकडून फंड्स शेअर करण्याबाबत एक माहिती दिली आहे.

Sushant Singh Rajput left funds for his pet dogs before his death caretaker reveals | आत्महत्येच्या एक दिवसआधी सुशांतने पेट्ससाठी पैसे केले होते ट्रान्सफर, केअरटेकरचा खुलासा

आत्महत्येच्या एक दिवसआधी सुशांतने पेट्ससाठी पैसे केले होते ट्रान्सफर, केअरटेकरचा खुलासा

googlenewsNext

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर त्याच्या परिवाराला आणि मित्रांना जेवढं दु:खं झालं तेवढंच दु:खं त्याचा कुत्रा फज यालाही झालंय. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या परिवाराने फजला पटण्याला नेलं. आता सुशांतच्या लोणावळा येथील फार्म हाउसचा केअऱटेकर रईसने सुशांतकडून फंड्स शेअर करण्याबाबत एक माहिती दिली आहे.

केअरटेकर रईसने एका न्यूज एजन्सीला सांगितलं की, सुशांतने मृत्यूच्या एक दिवसआधी त्याच्य तीन रॉटविलर्स(कुत्र्यांची प्रजाती) अमर,अकबर आणि एंथनीच्या नावाने फंड्स ट्रान्सफर केले होते. फजसोबतच सुशांतकडे आणखी तीन कुत्रे होते जे त्याच्या लोणावळ्यातील फार्म हाउसवर राहत होते. रईने सांगितले की, '१४ जूनच्या दुपारी जेव्हा मी टीव्हीवर सुशांतच्या आत्महत्येची बातमी पाहिल तेव्हा विश्वास बसला नाही. एक दिवसाआधीच त्यानी अमर, अकबर, एंथनीसाठी फंड ट्रान्सफर केले होते. सुशांत फार्म हाउसवर शिफ्ट होऊन ऑर्गेनिक फार्मिंगचं प्लॅनिंग करत होता'.

रईसने पुढे सांगितले की, 'सुशांत फार्म हाउसवर नेहमीच येत होते. ऑक्टोबर २०१९ मध्ये यूरोप ट्रिपनंतर त्यांची तब्येत जरा बिघडू लागली होती. त्यामुळे दोन महिने ते फार्महाउसवर आले नाहीत. त्यांनी फार्महाउस २०१८ मध्ये रेंटवर घेतलं होतं. एका वर्षाने जेव्हा रिन्यूअलची वेळ आली तेव्हा त्यांना हे फार्महाउस खरेदी करायचं होतं. इथेच त्यांना नेहमीसाठी शिफ्ट व्हायचं होतं'.

रईसने सांगितले की, सुशांतला मार्चनंतर दोन महिने इथेच रहायचं होतं. पण तसं झालं नाही. रिया आणि तिच्या वडिलांचा वाढदिवस किंवा खास कार्यक्रम इथेच केले जात होते. जानेवारीत सुशांत सर रियाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी इथेच आले होते. त्यांच्यासोबत सॅम्युअल मिरांडा, श्रुति मोदी आणि काही आणखी मित्र होते. नंतर सुशांत सर फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात इथे आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत दिपेश सावंत, सिद्धार्थ पिठानी, नीरज आणि केवश होते. मार्चमधील त्यांची ट्रिप कॅन्सल झाली होती'.

'जानेवारीमध्ये हे लोक पवाना आयलॅंडला गेले होते. जिथे श्रुतिचा पाय फ्रॅक्चर झाला होता. तिला आम्ही लोणावळा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो होतो. दुसऱ्या दिवशी तिला मुंबईला शिफ्ट केलं होतं. रईसने सांगितले की, अमर, अकबर, एंथनी आता फार्महाउसवरच आहेत. जर कुणाला त्यांना दत्तक घ्यायचं असेल तर घेऊ शकतात.

हे पण वाचा :

बँकॉक ट्रिपवर केवळ आणि केवळ सारा अली खानसाठी सुशांतने बुक केले होते चार्टर्ड प्लेन

2019 मध्ये बर्थडेला सुशांत साराला करणार होता प्रपोज? मॅनेजरने केला अनेक गोष्टींचा खुलासा

Web Title: Sushant Singh Rajput left funds for his pet dogs before his death caretaker reveals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.