14 जूनला सुशांतच्या रुममध्ये नेमकं काय घडलं, हे जाणून घेण्यासाठी CBI उचलणार महत्त्वाचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 12:35 PM2020-08-15T12:35:42+5:302020-08-15T12:45:51+5:30

सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा तपास सध्या ईडी आणि सीबीआय करत आहेत

Sushant singh rajput death case cbi conduct dummy test in actor room | 14 जूनला सुशांतच्या रुममध्ये नेमकं काय घडलं, हे जाणून घेण्यासाठी CBI उचलणार महत्त्वाचे पाऊल

14 जूनला सुशांतच्या रुममध्ये नेमकं काय घडलं, हे जाणून घेण्यासाठी CBI उचलणार महत्त्वाचे पाऊल

googlenewsNext

सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा तपास सध्या ईडी आणि सीबीआय करत आहेत. रोज नवे खुलासे सुशांतच्या प्रकरणात होत आहेत. 
नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार, आगामी काळात, सीबीआय सुशांत सिंग राजपूतच्या खोलीत डमी चाचणी घेईल, जो रिक्रिएशनचा एक भाग असणार आहे. मृत्यूचे कारण समजण्यासाठी सीबीआय एक्सपर्टच्या मदतीने पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि विसरा रिपोर्ट समजून घेतील. तसचे विसराचा कोणतेही अतिरिक्त नमुना आहे की नाही हे देखील तपास होणार आणि गरज पडली तर सीबीआय पुन्हा एकदा याचा नमुना दुसऱ्या लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात येईल. 

 सुशांत सिंग राजपूतचे वडील आणि बहीण यांच्या व्यतिरिक्त आणखी 4 जणांची सीबीआयने जबाब नोंदवला आहे. त्यांची नावं अजून समोर आलेली नाही. सीबीआयला दिलेल्या निवेदनात सुशांतला औषधांचा ओव्हरडोस आणि चुकीची औषधं दिल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. सीबीआय लवकरच सुशांतच्या डॉक्टरांशी देखील संपर्क करणार आहेत. 

ईडीला सुशांतची कंपनीचे व्यवहार, बँक खाती आणि त्यावरील रक्कमेचे अनेक संदिग्ध व्यवहार आढळले आहेत. यावर रियाला विचारले असता तिने उत्तर देणे टाळले आहे. यामुळे सुशांतच्या वडिलांनी लावलेले आरोप खरे ठरू लागले आहेत. सुशांतच्या वडिलांनी सुशांतच्या खात्यात 17 कोटी रुपये होते असा दावा केला होता. आता ईडीच्या चौकशीमध्ये सर्व समोर येणार आहे.

Web Title: Sushant singh rajput death case cbi conduct dummy test in actor room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.