सुशांतपासून श्रुती मोदी लपवायची बँक स्टेटमेंट, समोर आले बँक मॅनेजरसोबतचे 'ते' चॅट!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 03:11 PM2020-09-05T15:11:21+5:302020-09-05T15:22:48+5:30

सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा तपास वेगाने केला जातो आहे.

Sushant singh rajput chat with business manager rajat mewati told cbi shruti modi hide sushant bank statement | सुशांतपासून श्रुती मोदी लपवायची बँक स्टेटमेंट, समोर आले बँक मॅनेजरसोबतचे 'ते' चॅट!

सुशांतपासून श्रुती मोदी लपवायची बँक स्टेटमेंट, समोर आले बँक मॅनेजरसोबतचे 'ते' चॅट!

googlenewsNext

सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा तपास वेगाने केला जातो आहे. सीबीआय, ईडी आणि एनसीबी या तीन एजेंसी या प्रकरणाचा  तपास करत आहेत. शौविक आणि सॅम्युअलला 9 तारखेपर्यंत म्हणजेच 4 दिवस एनसीबीच्या रिमांडवार आहेत.  या प्रकरणात, ईडी मनी लॉन्ड्रिंग अँगलसह तपास करीत आहे. या दरम्यान अनेक खुलासे होतायेत. या प्रकरणात सुशांतचा बिझनेस मॅनेजर वरुण माधुर आणि अकाऊंट रजत मेवाती यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार, सुशांतची एक्स मॅनेजर श्रुती मोदीने अभिनेत्यापासून स्टेटमेंट लपवल्याचा आरोप आहे. याशिवाय एक घटना सांगितली जात आहे जी रिया चक्रवर्तीने संभाळून घेतले. 

  टाइम्सच्या नाउच्या रिपोर्टनुसार, रजत मेवातीने आरोप केला आहे की श्रुती मोदी सुशांतला बँक स्टेटमेंट दाखवले जायचे नाही. याबाबत सुशांतला कळले होते तो श्रुतीशी बोलला देखील होता. यावेळी श्रुतीने रियाला बोलवून हे प्रकरण मिटवलं होते. रिपोर्टमध्ये या अहवालात असेही सांगण्यात आले आहे की 21 मे रोजी सुशांत आणि त्याचे बँक मॅनेजर यांच्यातले एक नवीन व्हॉट्सअॅप चॅटही सापडले आहे, जे 21 मे रोजी झालेले आहेत.

सुशांतचे बँक मॅनेजरशी  झालेले चॅट 

यात सुशांतने लिहिले, हाय हर्ष, मी सुशांत राजपूत आहे. प्लीज जेव्हा वेळ मिळेल तेव्हा कॉल कर. यावर हर्षचे उत्तर येते, हाय, मला काही पेपरवर तुमच्या सहीची गरज आहे. मी कोणत्या ईमेल आयडीवर फॉर्म पाठवू? सुशांतल्या बँकेच्या अकाऊंटमध्ये नक्की काय बदल करुन हवा होता हे अजून कळू शकले नाही. ईडी सध्या या प्रकरणाशी संबंधीत लोकांची चौकशी करते आहे. 
 

 

Web Title: Sushant singh rajput chat with business manager rajat mewati told cbi shruti modi hide sushant bank statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.