सुशांत सिंग राजपूत आणि जॅकलिन फर्नांडिस ही जोडी तशी नवीनच..पण, आता ते एका नव्या अंदाजात प्रेक्षकांसमोर येणारेत. ‘ड्राइव्ह’ चित्रपटातून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. या चित्रपटातील ‘मखना’ हे गाणे नुकतेच लाँच झाले आहे. या गाण्यातील त्यांची केमिस्ट्री पाहून नकळत तुमचेही पाय या गाण्यावर थिरकतील यात काही शंका नाही. हे पार्टी साँग असून यात सुशांत-जॅकलिन हे त्यांच्या  फ्रेंडसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसत आहेत. तुम्हीही बघा कशी दिसतेय त्यांची केमिस्ट्री ते...

‘ड्राइव्ह’ या चित्रपटातील ‘मखना’ हे प्रेपी साँग असून यात सुशांत सिंग राजपूत आणि जॅकलिन फर्नांडिस ही आगळीवेगळी आणि फ्रेश जोडी दिसतेय.  हे या चित्रपटातील लाँच होणारे पहिले गाणे आहे. या गाण्यात सुशांत-जॅकलिन हे त्यांच्या फ्रेंडससोबत मजा करताना दिसत आहेत. हे गाणे तनिष बागची यांनी संगीतबद्ध केले आहे. हे गाणे तनिष बागची, यासेर देसाई आणि असिस कौर यांनी गायले आहे. या गाण्याचे गीतकार ओझिल दलाल आणि तनिष बागची हे आहेत. हे गाणे या आठवडयाच्या टॉप ५ गाण्यांमध्ये सध्याचे लीडिंग गाणे असल्याचे समजतेय. 

 या ट्रेंडिंग ट्यूनमध्ये ‘मरजावा’ मधील तुम ही आना, ‘वॉर’ मधील घुंगरू, ‘ड्रीम गर्ल’ मधील राधे राधे, ‘पल पल दिल के पास’ चित्रपटाचे शीर्षकगीत या सर्व गाण्यांमध्ये ‘मखना’ हे साँग ट्रेंडमध्ये आहे. तरूणाईची पहिली पसंती या गाण्याला मिळतेय.

Web Title:   Sushant-Jacqueline launches new party song 'Makhna'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.