सुशांतने बहिणीसाठी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिली होती स्पेशल नोट, सोशल मीडियावर होतेय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 11:53 AM2020-07-06T11:53:57+5:302020-07-06T11:54:39+5:30

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतची बहिण श्वेता सिंग अमेरिकेत रहात आहे. नुकतेच तिने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत सुशांतचे हस्ताक्षर पहायला मिळत आहे. सुशांतने आपल्या बहिणीला हे कार्ड काही दिवसांपूर्वी दिले होते.

Sushant had written a special note in her own handwriting for her sister, which is going viral on social media | सुशांतने बहिणीसाठी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिली होती स्पेशल नोट, सोशल मीडियावर होतेय व्हायरल

सुशांतने बहिणीसाठी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिली होती स्पेशल नोट, सोशल मीडियावर होतेय व्हायरल

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या अचानक आलेल्या निधनाच्या वृत्तावर अद्याप विश्वास बसत नाही. त्याच्या चाहत्यांसोबत त्याच्या घरातले देखील खूप दुःखी आहेत. सुशांतची बहिण श्वेता सिंग किर्ती अमेरिकेत राहते आणि ती तिचा भाऊ सुशांतशी निगडीत काही पोस्ट शेअर करत असते. नुकतेच तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात सुशांतची हॅण्ड रायटिंग पहायला मिळते आहे. या नोटमधून लक्षात येते की सुशांत आपल्या बहिणीला मोटिवेट करण्याचा प्रयत्न करत आहे.

सुशांतने हे कार्ड काही दिवसांपूर्वी बहिणीला दिले होते. या कार्डमध्ये एक प्रोत्साहन देणारा मेसेज पहायला मिळतो आहे. यात त्याने लिहिले आहे की ज्या मुली सांगतात की हे त्या करू शकतात आणि ज्या सांगतात की त्या हे नाही करू शकत आहेत. साधारण दोघीही योग्य असतात. यातील तुम्ही पहिल्यावाल्या आहात. लव यू, भाऊ सुशांत.

श्वेताने याशिवाय आणखी एक पोस्ट शेअर केली होती ज्यात तिच्या मुलासोबत सुशांतसंदर्भात केलेली बातचीत शेअर केली होती. याशिवाय सुशांतच्या चाहत्यांना संदेश दिला होता की सर्वांना मजबूत राहण्याची गरज आहे. तिने लिहिले होते की, जेव्हा मी माझा मुलगा निर्वाणला सांगितले की मामा आता आपल्यात नाही तर त्याने मला म्हटले की पण ते तुमच्या हृदयात जिवंत आहेत.

Read in English

Web Title: Sushant had written a special note in her own handwriting for her sister, which is going viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.