सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचा फोन वापरतेय रिया? कंगना राणौतने दिलेला पुरावा जरा पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 04:38 PM2020-07-29T16:38:11+5:302020-07-29T16:38:45+5:30

म्हणाली, आता तर सीबीआय चौकशी व्हायलाच हवी

sushant case actor following alia on social media Kangana Ranaut demand cbi | सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचा फोन वापरतेय रिया? कंगना राणौतने दिलेला पुरावा जरा पाहा

सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचा फोन वापरतेय रिया? कंगना राणौतने दिलेला पुरावा जरा पाहा

googlenewsNext
ठळक मुद्देकंगनाच्या टीमने नेमक्या या युजरचे ट्वीट रिट्वीट करत, या प्रकारावर संशय व्यक्त केला आहे. केवळ इतकेच नाही तर यात तिने महेश भट यांनाही लक्ष्य केले आहे.

सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या का केली? हा प्रश्न अनुत्तरीत असताना आता या प्रकरणाचे एक वेगळेच वळण घेतले आहे. सुशांतच्या वडिलांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर अनेक धक्कादायक आरोप केले आहेत. या आरोपांनी तपासाची दिशाच बदलली असताना आता कंगना राणौतने एक मोठा खुलासा करून खळबळ उडवून दिली आहे. होय, सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचा फोन कोण वापरत होते? असा सवाल करत तिने एक स्क्रिनशॉट शेअर केला आहे.

काय कंगनाने दिला पुरावा?

तर झाले असे की, अभिषेक राजपूत नावाच्या एका युजरने एक स्क्रिनशॉट ट्वीटरवर  शेअर केला. सुशांतने आलिया भटला सोशल मीडियावर फॉलो केल्याचे नोटीफिकेशन या स्क्रिनशॉटमध्ये दिसतेय.  सुशांत सोशल मीडियावर आलियाला फॉलो करत होता, खरे तर यात गैर काहीही नाही. पण यात एक ट्वीस्ट आहे. होय, सुशांत या जगातून गेल्यानंतर त्याने आलियाला फॉलो केले आहे. म्हणजेच, सुशांत या जगातून गेल्यानंतर सोशल मीडियावर ही घडामोड झाली आहे.  
कंगनाच्या टीमने नेमक्या या युजरचे ट्वीट रिट्वीट करत, या प्रकारावर संशय व्यक्त केला आहे. केवळ इतकेच नाही तर यात तिने महेश भट यांनाही लक्ष्य केले आहे. ‘आता तर सुशांत प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी. रिया चक्रवर्तीजवळ सुशांतचे सगळे गॅजेट आहेत. होऊ शकते महेश भटने तिला आदेश दिला असेल की, आलियाला फॉलो करायचे आहे. सुशांतच्या अनेक पोस्टही डिलीट करण्यात आल्या होत्या,’ असे ट्वीट कंगनाच्या वतीने तिच्या टीमने केले आहे.

Web Title: sushant case actor following alia on social media Kangana Ranaut demand cbi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.