ऑस्कर नॉमिनेटेड चित्रपट 'लगान'ला प्रदर्शित होऊन आज १८ वर्षे पूर्ण झालीत. इतके वर्ष उलटल्यानंतर या चित्रपटातील अभिनेता आमीर खान बॉलिवूडचा सुपरस्टार झालाय. तर या सिनेमातील अभिनेत्री ग्रेसी सिंग आता सिनेइंडस्ट्रीत काम करताना दिसत नाही.
लगान चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री ग्रेसी सिंग काही वर्षांपूर्वी मालिका जय संतोषी माँमध्ये संतोषी देवीच्या भूमिकेत दिसली होती. तसेच ग्रेसी सिंग शेवटची २०१५ साली पंजाबी सिनेमा चुडियामध्ये दिसली होती.

ग्रेसी त्या अभिनेत्रींपैकी आहे जिने कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख बनवली. लगान चित्रपटात ग्रेसीने गावातील तरूणीची भूमिका केली होती. तिच्या या भूमिकेचे सगळीकडून खूप कौतूकही झाले होते.

या चित्रपटासाठी ग्रेसीला आईफाचा स्टार डेब्यु ऑफ द ईयर, स्क्रीन अवॉर्डचा मोस्ट प्रॉमिसिंग न्युकमर व झी सिनेचा बेस्ट फीमेल डेब्युचा पुरस्कार मिळाला.


पहिल्याच चित्रपटात सर्वोत्कृष्ट पदार्पणाच्या पुरस्कारावर आपली मोहोर उमटवित तिने दिग्दर्शक व प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं.


२००२ साली ग्रेसीने तेलुगू चित्रपट संतोषममध्ये काम केले होते. त्यानंतर अरमान, गंगाजल, मुन्नाभाई एमबीबीएस, मुसकान, शर्त, वजह, ये है जिंदगी, द वाइट लैंड, चूड़ियां, लख परदेसी होइए या चित्रपटात काम केले.


ग्रेसीचा जन्म १९८० साली दिल्लीत झाला. तिचे वडील स्वर्ण सिंग प्रायव्हेट कंपनीत कार्यरत होतो. तिची आई परजिंदर कौर एक शिक्षिका होत्या. सुपरहिट चित्रपट लगान, गंगाजल व मुन्नाभाई एमबीबीएसमध्ये तिने काम केले. तसेच जय संतोषी माँ मालिकेत मुख्य भूमिका केली. आता ही मालिका प्रसारीत होत नाही.

ग्रेसी १९९९ साली प्रदर्शित झालेल्या हम आपके दिल में रहते हैमध्ये पहायला मिळाली. तिने झीटीव्हीची मालिका अमानतमध्ये देखील काम केले.

ती क्लासिकल डान्सर असून तिने भरतनाट्यम व ओडिसी डान्समध्ये प्रशिक्षण घेतले आहे.


Web Title: superhit film lagaan debutant bollywood actress gracy singh
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.