ठळक मुद्देही शाळा सनी आणि तिचा पती डेनियल यांच्यासाठी एका स्वप्नासारखे आहे. तूर्तास या शाळेचे इंटिरिअर आणि सुखसुविधांवर सनी व डेनियल जातीने लक्ष देत आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी लवकरच ‘अर्जुन पटियाला’ या चित्रपटात एक आयटम सॉन्ग करताना दिसणार आहे. याशिवाय एका मल्याळम चित्रपटातही ती झळकणार आहे. ‘रंगीला’ या  चित्रपटातून ती मल्याळम चित्रपटसृष्टीत पर्दापण करतेय. ‘कोका कोला’नामक कॉमेडी चित्रपटातही सनीची वर्णी लागली आहे. याशिवाय आणखी एक काम सनीने हाती घेतले आहे. ते म्हणजे,बच्चेकंपनीसाठीची शाळा. होय, सनी व तिचा पती डेनियल वीबर लवकरच एक शाळा उघडणार आहेत.


मिड डेने दिलेल्या वृत्तानुसार, सनी D'Art Fusion या शाळेची नवी शाखा उघडणार आहे. हे आर्ट स्कूल लहान मुलांसाठी असेल. सनी आणि डेनियल यांना तीन मुले आहेत. निशा, नोआ आणि अशर अशी त्यांची नावे. सध्या निशा D'Art Fusionच्या एका ब्रँचमध्ये जाते. सनी व डेनियल यांना निशाची ही शाळा खूप आवडली आणि त्यांनी जुहूत या शाळेची नवी ब्रँच उघडण्याचा निर्णय घेतला.


डेनियलने यासंदर्भात सांगितले की, आमची मुलगी निशा D'Art Fusion या शाळेत शिकते. ही शाळा आम्हाला खूप आवडली. या शाळेच्या संचालिका एशर कामदार यांच्याशी आमची भेट झाली आणि आम्ही जुहूत या शाळेची एक नवी ब्रँच उघडण्याचा निर्णय घेतला. सनीने याबद्दल सांगितले की, मुलांच्या मानसिक आणि शारीरिक वाढीसोबतच त्यांची रचनात्मक वाढ महत्त्वाची आहे. मुले फक्त पुस्तकी किडे बनून राहावे, हे आम्हाला मान्य नाही. मुलांना आजुबाजूचे जग पाहावे, त्यातून शिकावे आणि मौजमस्ती करावी, असे आम्हाला वाटते. आमची शाळा एक प्ले स्कूल असेल.


ही शाळा सनी आणि तिचा पती डेनियल यांच्यासाठी एका स्वप्नासारखे आहे. तूर्तास या शाळेचे इंटिरिअर आणि सुखसुविधांवर सनी व डेनियल जातीने लक्ष देत आहेत.


Web Title: sunny leone to start new schook husband daniel weber in mumbai juhu
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.