ठळक मुद्देसनीच्या या आयटम साँगला तिच्या चाहत्यांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात हे गाणे सुरू झाल्यानंतर लोक आपल्या खुर्चीवरून उठून नाचत आहेत.

सनी लियोनीचे आज केवळ भारतात नाही तर जगभर अनेक चाहते आहेत. आजवर बॉलिवूडमध्ये ती अनेक आयटम साँगवर थिरकली आहे. तिने बॉलिवूडप्रमाणेच अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. नुकतीच ती एका मल्याळम चित्रपटात झळकली होती. या चित्रपटाचे नाव मधुरा राजा असे असून या चित्रपटात एक गाणे तिच्यावर चित्रीत करण्यात आले होते. या चित्रपटात मुख्य भूमिका मल्याळम सुपरस्टार माम्मुटी याची आहे. 

माम्मुटी हा दक्षिणेतील सुपरस्टार असून त्याचा चित्रपट म्हटला की, प्रेक्षक त्याच्या चित्रपटाला गर्दी करणार यात काही शंकाच नाही. त्याच्या सगळ्याच चित्रपटांना आजवर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. आता त्याच्या मधुरा राजा या चित्रपटाला देखील प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाची कथा, माम्मुटीचा अभिनय हे प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. पण त्याचसोबत या चित्रपटातील सनीच्या आयटम साँगची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. सनीच्या या आयटम साँगला तिच्या चाहत्यांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात हे गाणे सुरू झाल्यानंतर लोक आपल्या खुर्चीवरून उठून नाचत आहेत. चित्रपटात सनीचे गाणे सुरू झाल्यानंतर चाहते पडद्यासमोर बेफाम नाचत असतानाचा व्हिडिओ स्वतः सनी लियोनीनेच तिच्या इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केला आहे. 

सनीने हा व्हिडिओ शेअर करून लोकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे मी खूपच खूश असल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे. मधुरा राजा नंतर सनी लिओनी आणखी एका मल्याळम चित्रपटात काम करणार आहे. या चित्रपटाचं नाव ‘रंगीला’ असून लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. संतोष नायर या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत.

भारतीय-कॅनेडियन असलेली सनी लिओनी मुळात पोर्नस्टार आहे. त्यानंतर सनीने 'जिस्म 2' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आज सनी लिओनीची गणना बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते. बिग बॉसच्या पाचव्या सिझनमध्ये सनी लिओनी सहभागी झाली होती. याच कार्यक्रमामुळे ती जास्त प्रकाशझोतात आली होती.


Web Title: Sunny leone south indian movie's madhuraraja item song goes viral
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.