बेबी डॉल मै सोने दी म्हणत अख्या जगाला वेड लावणारी पॉर्न स्टार आणि आयटम गर्ल सनी लिओनीने तिचा पती डॅनियल वेबरवद्दल काही धक्कादायक गोष्टी सांगितल्या आहे.  पिकंव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत सनीने तिची भेट डॅनिअलशी
कशी आणि कधी झाली तसेच त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. सनीने सांगितले की, मी लेस्बिनयन अर्थात समलैंगिक असल्याचा डॅनिअलला संशय होता. पहिल्याच भेटीत डॅनिअलने तिला  लेस्बियन आहेस का असा प्रश्नच
विचारला होता. सनी ज्या मुलीबरोब राहत होती ती लेस्बियन होती. आणि नेहमीच अतरंगी राहायची त्यामुळे डॅनिअला  सनी देखील लेस्बियन असल्याचे वाटायचे. आयटम गर्ल बनण्याआधी सनी ही पॉर्न स्टार म्हणूनच जास्त फेमस होती.
भारतीय-कैनेडियन असलेली सनी लिओनी मुळात पोर्नस्टार आहे. 

त्यानंतर सनीने 'जिस्म 2' बॉलिवूड पदार्पण केले होते. आज सनी लिओनीची गणना बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते.बिग बॉसच्या 5 व्या सिझनमध्ये सनी लिओनी सहभागी झाली होती.याच कार्यक्रमामुळे ती जास्त प्रकाशझोतात
आली होती.  सनीने नंतर डॅनिअलशी लग्न करत तिच्या आयुष्याला नवीन सुरूवात केली. सनी आणि डॅनिअलच्या लग्नाला आता १२ वर्ष झाली आहेत. सनी आणि डॅनिअल यांच्यात खूप चांगली केमिस्ट्री आहे.  सनी आता संसारात रमली आहे. तिला
तीन मुलं देखील आहेत. 

सनी कोट्यावधीची मालकीण आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीनुसार सनीकडे ९७ कोटी रुपयांची संपत्ती आहे. तिचे वार्षिक उत्पन्न २ कोटींच्या घरात आहे. याशिवाय १.१४ कोटी किंमतीच्या अनेक आलिशान आणि महागड्या गाड्यांचं कलेक्शन
तिच्याकडे आहे. मुंबईतील तिच्या बंगल्याची किंमत जवळपास ३ कोटींच्या घरात आहे. याशिवाय अमेरिकेतही तिचा बंगला आहे. या बंगल्याची किंमत जवळपास ३० कोटी आहे. सध्या सनी अभिनयासह तिचं आईपण एन्जॉय करत आहे.

सोशल मीडियावर सनी आणि तिच्या मुलाचा हा फोटो व्हायरल होत आहे. सनीची जुळी मुलं आपल्या निरागसतेने तैमूर अली खानला सोशल मीडियावर टक्कर देत आहेत. पती डॅनिअल आणि मुलांसोबत सनी कायमच पाहायला मिळते. सोशल
मीडियावर ती त्यांच्यासोबतचे फोटो शेअर करत असते. 

Web Title: Sunny Leone says husband Daniel Weber thought she was a lesbian- SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.