सनी लियोनी सांगतेय, माझ्या मुलांना मी शिकवते या गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2019 07:50 PM2019-07-27T19:50:57+5:302019-07-27T19:52:14+5:30

सनी कितीही कामात असली तरी ती जास्तीत जास्त वेळ हा तिच्या मुलांना देण्याचा प्रयत्न करते.

Sunny leone has taught their children about sharing is caring | सनी लियोनी सांगतेय, माझ्या मुलांना मी शिकवते या गोष्टी

सनी लियोनी सांगतेय, माझ्या मुलांना मी शिकवते या गोष्टी

googlenewsNext
ठळक मुद्देआई झाल्यानंतर अनेक चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतात. आता काम करताना देखील माझ्या डोक्यात हेच सुरू असते की, माझ्या मुलांना माझी गरज आहे...

स्प्लिट्सव्हिलाच्या १२व्या पर्वाला लवकरच सुरुवात होणार आहे. या पर्वाचे देखील सनी लियोनी आणि रणविजय सिंग हे दोघे मिळून सूत्रसंचालन करणार आहेत. या कार्यक्रमाविषयी आणि सनीच्या खाजगी आयुष्याबाबत तिच्याशी मारलेल्या गप्पा...

स्प्लिट्सव्हिलाच्या आजवरच्या सिझनमध्ये आणि आताच्या सिझनमध्ये काय बदल असणार आहेत?
स्प्लिट्सव्हिलाची संकल्पना ही तशीच असणार आहेत. तसेच रणविजय आणि मी पुन्हा एकदा या कार्यक्रमाचा भाग असणार आहोत. केवळ स्पर्धक, लोकेशन हे वेगळे असणार आहेत. यंदा आम्ही जयपूरला चित्रीकरण केले असून तेथील लोकेशन खूपच छान होते. सध्याच्या डेटिंग आयडिया बदलल्या आहेत. आजची मुलं ऑनलाईन डेटिंगला जास्त पसंती देतात. पार्टीत, समारंभात भेटल्यावर नव्हे तर ऑनलाइन एकमेकांना जाणून घेतल्यानंतर डेट करण्याकडे त्यांचा कल असतो. त्यामुळे हा ऑनलाइन डेटिंग फंडा या सिझनमध्ये आम्ही वापरणार आहोत.

ऑनलाईन डेटिंग या संकल्पनेवर तुझा विश्वास आहे का?
मी स्वतः अशाप्रकारे कधीच नात्यात पडलेली नाहीये. त्यामुळे या प्रकारच्या डेटिंगबाबत मला तितकेसे माहीत नाही. अशाप्रकारे डेटिंग करूनही काही लोकांचे नाते यशस्वी होत आहे तर काहींना नात्यात अपयश मिळत आहे. प्रत्येक व्यक्तीसाठी हे वेगवेगळे आहे. पण सध्याच्या काळात ही संकल्पना प्रचंड फेमस झाली आहे.

तू कामात व्यग्र असूनही मुलांना वेळ कशाप्रकारे देतेस?
तुम्ही एखादे स्वप्न पाहिले असेल तर ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही अनेक प्रकारे प्रयत्न करतात. माझे काम हे माझे स्वप्न आहे आणि त्याचमुळे मी आराम कमी करते आणि जास्त वेळ माझ्या कामाला देते. पण कामात कितीही व्यग्र असले तरी जास्तीत जास्त वेळ मुलांसोबत घालवण्याचा प्रयत्न करते. माझी तिन्ही मुलं खूपच लहान असल्याने त्यांच्याकडे लक्ष द्यावे लागते. कधी कधी तर त्यांना एकाच खेळण्यांसोबत खेळायचे असते. त्यावरून ते भांडतात. मग त्यांना प्रत्येक गोष्ट भावा-बहिणीसोबत शेअर करायची असते हे शिकवायला लागते.

आई झाल्यानंतर तुझ्या आयुष्यात किती बदल घडला आहे?
आई झाल्यानंतर अनेक चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतात. आता काम करताना देखील माझ्या डोक्यात हेच सुरू असते की, माझ्या मुलांना माझी गरज आहे... मी सतत त्यांच्यासोबत असले पाहिजे. मी कामानिमित्त बाहेर असले तर मला त्यांची प्रचंड काळजी वाटत असते. मला प्रत्येक क्षण त्यांच्यासोबत घालवायचा असतो. पण काम देखील तितकेच महत्त्वाचे असल्याने मी काम आणि कुटुंब यांच्यात ताळमेळ घालण्याचा प्रयत्न करते.  

Web Title: Sunny leone has taught their children about sharing is caring

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.