ठळक मुद्दे 2011 मध्ये सनीने डॅनिएलशी लग्न केले. 

बेबी डॉल सनी लिओनी आज बॉलिवूडची एक मोठी स्टार आहे. पण आजही तिची पॉर्न स्टार ही ओळख पूर्णपणे पुसल्या गेलेली नाही. बॉलिवूडमध्ये येण्याआधी सनी पॉर्न स्टार होती. पण पॉर्न स्टार बनण्यासाठीचा तिचा संघर्षही कमी नव्हता. एकेकाळी पैशांसाठी सनी पहाटे पेपर वाटायची. बेकरीमध्ये काम करायची.
सनीने पॉर्न इंडस्ट्रीत एन्ट्री घेतली खरी, पण एका अटीवर. होय, मी केवळ बॉयफ्रेन्डसोबत पॉर्न सीन्स शूट करेल, ही तिची अट होती. याच अटीवर 2007 मध्ये तिने पहिला कॉन्ट्रक्ट साईन केला. यानंतर सनी व तिच्या बॉयफ्रेन्डने एकूण सहा पॉर्न फिल्म केल्यात. या बॉयफ्रेन्डचे नाव होते, मेट एरिक्सन.

प्लेबॉयच्या विभागाचा विपणन अधिकारी मेट एरिक्सन यानेच सनीला पॉर्न इंडस्ट्रीत येण्यासाठी प्रोत्साहन दिले होते. पुढे सनी व मेट एकमेकांच्या प्रेमात पडले.  त्या वेळी मेट हेच सनीचे विश्व होते. त्याला हवे तसे, सनीने केले. खरे तर पॉर्न इंडस्ट्रीत आली तेव्हा सनी केवळ 19 वर्षांची होती. त्यामुळे दोघांच्या वयात मोठा फरक होता. शिवाय मेटचे आधीच लग्न झाले होते. यानंतर त्याने पत्नीला घटस्फोट दिला होता.

मेटच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या सनीने मेटसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2007 मध्ये दोघांचा साखरपुडाही झाला. पण त्यानंतर त्यांच्यात बरेच काही बिनसले. काही वर्षांनंतर जेव्हा सनी बिग बॉस रियालिटी शो दिसली, तेव्हा मेटने सनीच्या नावावर प्रचंड पैसा कमावला. सनीचे कंपनीद्वारे बनवले व्हिडिओ भरपूर त्याने विकले. हे सर्व सनीसाठी प्रचंड धक्कादायक होते.
यानंतर सनीच्या आयुष्यात कॅनडाचा सुप्रसिद्ध कॉमेडियन रसेल पीटर्सची एन्ट्री झाली. पण हे नातेही फार काळ टिकले नाही.

रसेलनंतर सनीला डॅनिएल वेबर भेटला. 2011 मध्ये सनीने डॅनिएलशी लग्न केले.  लवकरच एका मल्याळम चित्रपटातही ती झळकणार आहे. ‘रंगीला’ या  चित्रपटातून ती मल्याळम चित्रपटसृष्टीत पर्दापण करतेय. ‘कोका कोला’नामक कॉमेडी चित्रपटातही सनीची वर्णी लागली आहे.

 

Web Title: sunny leone did six porn films with her boyfriend

Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.