ठळक मुद्देसनी यांनी स्वत: भेटून या दोन अभिनेत्रींना सोबत काम करण्याची विनंती केली होती. पण या दोन्ही अभिनेत्रींनी स्पष्ट नकार दिला होता.

सनी देओल यांनी एक काळ गाजवला. रोमॅन्टिक चित्रपटापासून सनी देओल यांच्या फिल्मी करिअरला सुरुवात झाली. पण यानंतरच्या काळात अ‍ॅक्शन हिरो अशी त्यांची इमेज बनली. केवळ अ‍ॅक्शन हिरोच नाही तर एक तापट हिरो अशीच त्यांची प्रतिमा बनली. यामुळे बॉलिवूडच्या दोन आघाडीच्या नायिकांनी सनी देओल यांच्यासोबत काम करण्यास नकार दिला होता. ९० च्या दशकात सनी देओल यांना पडद्यावर पाहून चाहते अक्षरश: वेडे व्हायचे. त्यांच्या प्रत्येक डायलॉगवर टाळ्या पडायच्या. पण याचकाळात मोठ्या हिरोईन सनी देओलसोबत काम करताना कचरायच्या. कारण त्यांना स्वत:च्या इमेजला धोका वाटायला.

श्रीदेवी आणि ऐश्वर्या राय या दोघीही यापैकीच होत्या. सनी यांनी स्वत: भेटून या दोन अभिनेत्रींना सोबत काम करण्याची विनंती केली होती. पण या दोन्ही अभिनेत्रींनी स्पष्ट नकार दिला होता. या दोन अभिनेत्री होत्या श्रीदेवी आणि ऐश्वर्या राय.

सनी देओल ‘घायल’ या चित्रपटात श्रीदेवींना घेऊ इच्छित होते. त्यांनी स्वत:हून श्रीदेवींशी संपर्क साधला होता. पण श्रीदेवींना थेट नकार कळवला होता. ऐश्वर्यानेही सनीसोबत काम करण्यास नकार दिला होता. सनी देओल त्याकाळात स्टार होते. इतक्या मोठ्या स्टारला कुठलीही हिरोईन नकार कशी देऊ शकते, असे तुम्हाला वाटेल. पण हे घडले होते. सनी देओल यांचे फिल्मी करिअर तपासल्यास तुम्हाला एक गोष्ट ठळकपणे जाणवेल. ते म्हणजे, त्यांनी क्वचितच कुठल्या मोठ्या हिरोईनसोबत काम केले आहे.

एका मुलाखतीत सनी देओल यावर बोलले होते. त्यांनी सांगितले होते की, त्यांनी माझ्यासोबत काम करण्यास नकार का द्यावा, याचे नेमके कारण मला ठाऊक नाही. पण माझ्या मते, माझे चित्रपट मेल सेंट्रिक असतात, असे त्यांना वाटते. माझी इमेजच तशी बनली आहे. ‘गदर’मध्ये मी रोमान्स करत असतानाही मी अ‍ॅक्शन करतोय,असे लोकांना वाटले होते.


Web Title: sunny deol was rejected by sridevi and aishwarya just for his action image
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.